काय चाललंय काय? केपेत आसाममधील तरुणीवर बलात्कारानं खळबळ

सामूहिक बलात्काराची घटना समोर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता आणखी गंभीर बनलाय. बाणावलीतील समुद्र किनारी दोघा अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाचा आता आणखी एक सामूहिक बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय.

आता कुठे?

बाणावली येथील दोन अल्पवयीन मुलींवर चौघांनी बलात्कार केल्याची घटना २५ जुलैला मध्यरात्री घडली होती. त्यानंतर आता केपे येथील एका आसामच्या तरूणीवर दोन व्यक्तींनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना केपे पोलिसानी अटक केल्यानंतर त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बाणावलीतील दोघा तरूणीवर झालेले प्रकरण गोवा भर गाजतंय. विधानसभेतही याचे पडसाद उमटले होते. हा सगळा प्रकार ताजा असतानाच इडन गार्डन, केपे येथे एका प्लँटमध्ये पीडित तरुणीवर दोघा जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

हेही वाचा : त्या अल्पवयीन मुली रात्रभर बीचवर का होत्या?

Raped by father kalyan 800 450

नेमकी काय घटना?

दिल्ली येथील ३२ वर्षीय शंभूनाथ सिंग या व्यक्तीने मूळ आसाममधील असलेल्या एका युवतीला काम देतो म्हणून गोव्यात आणलं. सिंग याच्या बहिणीचा प्लान्ट इडन गार्डन येथे असल्याने 26 जुले रोजी त्या गोव्यात पोचल्या. त्या दिवशी शंभूनाथ सिंग या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर 28 रोजी कुडचडे इथं दुकान असलेल्या सुधाकर नाईक या ६३ वर्षीय व्यक्तीनंही या तरुणीवर बलाक्तार केला असल्याचे समोर आलंय.

हेही वाचा : बाणावली लैंगिक अत्याचार प्रकरणः सहभागी सरकारी कर्मचारी सेवेतून निलंबित

व्हिडीओही काढला!

या प्रकरणी स्वता मोबाईलवर व्हिडीओ रिकॉर्डिंग केल्याचीही माहिती मिळालीये. तसेच पीडित युवतीनं पोलीस कंट्रोल रुमला फोन केल्यामुळे हे सगळं प्रकरण समोर आलंय. या प्रकरणी बुधवारी 28 जुलै रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्या दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा : प्रेयसीला वैतागून माथेफिरुने तिच्या कुटुंबालाच संपवलं! शेतात पुरलेले मृतदेह हाती

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!