Breaking | पुन्हा एकदा पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षणाचं काम
मोपा प्रकल्प पीडितांचं आंदोलन पेटण्याची शक्यता

मकबूल | प्रतिनिधी
पेडणे : मोपा विमानतळ आणि हायवेला होत असलेल्लाय विरोधाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बामती समोर येते आहे. मेळावलीमध्ये जागेच्या सर्वेक्षणावरुन जो तणाव निर्माण झाला होता, तसाच तणाव आता मोपामध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवारी पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यात आलंय. याला स्थानिकांनी कडाडून विरोध केला.
सोमवारीही स्थानिकांनी तीव्र निदर्शनं केली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन कायम होतं. मात्र स्थानिकांचा विरोध झुगारुन पोलिस बळाचा वापर करत सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, मेळावलीनंतर आता मोपामध्येही तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. मेळावली आंदोलनाचा पॅटर्न मोपामध्ये पाहायला मिळतोय. पाहा त्याच संदर्भातला सविस्तर रिपोर्ट