‘पूर्वजांनी राखलेल्या जमिनी आमच्याच, सरकारच्या नाहीत’

'जमीन मालकी भूमिपुत्रांचीच'

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई : प्रजासत्ताक दिनीच सत्तरीतील लोकांनी उठाव केलाय. जमीन मालकीप्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी लोकं एकवटलेत. सत्तरीतील गावांची एकजूट यानिमित्तानं पाहायला मिळाली. यावेळी वेगवेगळ्या गावातील लोकांनी आपलं म्हणणं मांडलंय. आमच्या पूर्वजांनी राखलेल्या जमिनी आमच्याच असल्याचं यावेळी ठामपणे लोकांनी म्हटलंय. पूर्वजांनी राखलेली जमीन ही आमच्या मालकीची असून त्यावर सरकारनं हक्क सांगू नये, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

भीक नको, हक्क हवा!

७२व्या प्रजासत्ताक दिनी सत्तरी तालुक्यातील गावं एकवटल्याचं पाहायला मिळालं. आम्ही सरकारकडे जमिनीची भीक मागत नसून आपल्या हक्काची जमीन मागत असल्याचं म्हटलंय. विश्वजीत राणेंवरही यावेळी टीका केली आहे. त्यांनी सत्तरीतील लोकांची दिशाभूल केली असल्याचाही सूर यावेळी उमटला. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी व्यासपीठावर येऊन आमच्याशी चर्चा करावी, असं चॅलेंज देण्यात आलं.

सरकार काय करणार?

आयआयटीतील सत्तरीचा वाद मिटतो न मिटतोच, तोच सत्तरीतील सर्व गावं आक्रमक झाली आहेत. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातही या उठावाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भूमिपुत्रांच्या जमिनींचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली. यावर आता सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचंय. यावेळी सत्तरीतील लोकांनी गाऱ्हाणंही घातलं आणि जमीन मालकी प्रश्नावर संपूर्ण राज्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

पाहा LIVE

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!