BREAKING | राज्यातील प्रवासी टॅक्सी दरांत वाढ

पहिल्या एका किलो मीटरमागे 24 रुपये त्यानंतरच्या किलो मीटरला 21 रुपये असे भाडे आकारले जाईल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यातील टॅक्सी चालकांची गेल्या कित्येक वर्षापासून प्रवासी टॅक्सी भाडे दरवाढ करण्याची मागणी लावून धरली होती. त्याचप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर लक्षात घेता प्रवासी टॅक्सी दरांत वाढ करण्यात आलीये. वाढीव दरानुसार पहिल्या एका किलो मीटरमागे 24 रुपये, तर त्यानंतरच्या किलो मीटरला 21 रुपये असे भाडे आकारले जाणार असल्याचं समजतंय. प्रवासी टॅक्सी भाडे दरवाढ होणार असल्याची शक्यता वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी यापूर्वीच बोलून दाखवली होती. त्यानुसार ही दरवाढ बुधवारी झाली आहे.

हेही वाचाः कणकवलीनजीक 4,57,000 ची गोवा दारू पकडली ; एकास अटक

डिजिटल मीटर बुकिंग केंद्रे वाढवली

प्रवासी टॅक्सी दरांत वाढ करत असल्याची माहिती वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिलीये. भाडे दरवाढ करण्यासोबतच डिजिटल मीटर बुकिंग केंद्रे 4 होती ती आता 8 करण्यात आलीयेत. त्याचप्रमाणे 0 ते 1 पर्यंत सिरिज असलेल्या टॅक्सी मालकांना सरकारने 25 जुलैपर्यंत डिजिटल मीटर बसविण्याची सूचना दिली होती, फक्त 137 टॅक्सी मालकांनी अजूनपर्यंत डिजिटल मीटर बसवले असून सुमारे 500 जणांनी बुक केले आहेत. उर्वरित 2934 ऑड टॅक्सींचे परवाने सरकार रद्द करणार असल्याचं गुदिन्हो म्हणालेत. आता सरकारने 2 ते 3 सिरिजमधील टॅक्सीसाठी डिजिटल मीटरसाठीचे बुकिंग आणि मीटर बसवण्याच्या कामास सुरुवात केली आहे, अशी माहिती गुदिन्होंनी दिली.

हेही वाचाः केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ वाहनांसाठी रजिस्ट्रेशन आणि RC शुल्क माफ

डिजिटल मीटर खर्च योजनेच्या परतफेडीची पुनर्रचना

पुढे बोलताना गुदिन्हो म्हणालेत, सरकारने डिजिटल मीटर खर्च योजनेच्या परतफेडीची पुनर्रचना केली आहे. या अंतर्गत तीन ते चार आठवड्यांऐवजी आता टॅक्सी मालक चार दिवसांत डिजिटल मीटरवर खर्च केलेल्या 50% रकमेचा दावा करू शकतात आणि उर्वरित 50% रक्कम त्यांना नूतनीकरण/रिचार्ज दरम्यान एका वर्षात मिळू शकते.


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!