आतापर्यंतच्या कोविड बळींपैकी ६० टक्के मृत्यू हे एकट्या जीएमसीमध्ये!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : कोरोना बाधितांवर उपचारासाठी राज्यात पुरेशी कोविड हॉस्पिटल असली तरी सर्वाधिक कोविड बाधितांचा मृत्यू गोमेकॉत झाला आहे. जीएमसीत १४ जुलैपर्यंत १,८६९ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण बळींच्या तुलनेत ही संख्या सुमारे ६० टक्के होते. ६४ बाधितांचा घरात किंवा हॉस्पिटलात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
चिंताजनक आकडेवारी
विधानसभेतील प्रश्नोत्तरातून ही बाब स्पष्ट झाली आहे. १४ जुलैपर्यंत कोरोनाबळींचा आकडा ३,१०१ होता. त्यावेळी पर्यंतची ही स्थिती आहे. नवे बाधित मिळण्यासह बाधितांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी आताही दररोज एक किंवा दोघांचा मृत्यू कोरोनामुळे होत आहे. रविवारी एका बाधिताचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३,१६० झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतही बहुतेक बाधितांचा मृत्यू गोमेकॉत झाला आहे.

दक्षिण गोव्यात तुलनेनं प्रमाण कमी
गोमेकॉनंतर दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटमध्ये ५७६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण एकूण बळींच्या तुलनेत १८.५७ टक्के आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना सरकारने ईएसआय हॉस्पिटलचे करोना हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले होते. गंभीर कोरोना रुग्णांवर गोमेकॉत उपचार केले जात होते. ईएसआय हॉस्पिटलमध्ये २३६ बाधितांनी अखेरचा श्वास घेतला. हे प्रमाण ७.६१ टक्के आहे. यानंतर हॉस्पिसियो हॉस्पिटलमध्ये ६०, उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये ४९ बाधितांचा मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटलांमध्ये २३४ रुग्णांचा मृत्यू झाला. सावईकर हॉस्पिटल (फोंडा), आरजी स्टोन हॉस्पिटल, कांपाल क्लिनिक, बोरकर नर्सिंग होम, व्हिक्टर हॉस्पिटल, व्हिजन हॉस्पिटल, रेडकर हॉस्पिटल, हेल्थवे, साळगावकर मेडिकल रिसर्च या खासगी हॉस्पिटलांत बाधितांचा मृत्यू झाला आहे. मदर केअर हॉस्पिटलमध्ये ३७, व्हिक्टर हॉस्पिटलात ३४, तर व्हिजन हॉस्पिटलात २२ बाधितांचा मृत्यू झाला. या खासगी हॉस्पिटलांमध्ये सर्वाधिक बाधितांचा मृत्यू झाला.
हेही वाचा – धक्कादायक! कुऱ्हाडीनं वार करत गँगस्टर अनवर शेखची भररस्त्यात हत्या

लक्षणे दिसल्याबरोबर रुग्ण नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल होत होते. सर्व आरोग्य केंद्रांत एक वा दोघांचा मृत्यू झाला आहे. नावेली, कुडचडे, कोलवाळ, चिंचिणी, कांदोळी, पेडणे, काणकोण, खोर्ली, मडकई, शिरोडा, शिवोली, लोटली, केपे, सांगें या आरोग्य केंद्रांत बाधितांचा मृत्यू झाला आहे. कुडतरी आरोग्य केंद्रात सर्वाधिक ६ बाधितांचा मृत्यू झाला.
हेही वाचा – गोव्यात ‘घाटी’ हा शब्द शिवी असल्यासारखा वापरला जातो, त्यानिमित्त…
आणखी ६९ बाधित; एकाचा मृत्यू

शनिवार ते रविवार या २४ तासांत ६९ नवे कोरोनाबाधित आढळून आले. ८७ जणांनी करोनावर मात केली. एका बाधिताचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३,१६० झाली आहे. उपचारासाठी ८ बाधित हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. सध्या राज्यात ९८७ सक्रिय बाधित आहेत.
हेही वाचा – गोवा राज्यात 16 ऑगष्टपर्यंत कर्फ्यू वाढला