धक्कादायक! कुऱ्हाडीनं वार करत गँगस्टर अनवर शेखची भररस्त्यात हत्या

टायगर उर्फ अनवर शेखनं रक्ताच्या थारोळ्यात जीव सोडला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्याच्या गुन्हेगारी विश्वातून एक खळबळजनक बातमी हाती येते आहे. कुख्यात गुंड अनवर शेख उर्फ टायगरचा गेम झालाय. कर्नाटकातील शिर्शी येथे त्याची हत्या करण्यात आलीए. यासंबंधी नेमकं काय घडलं याचा शोध सुरू असला तरी टायगरच्या हत्येमुळे गोव्यातील गुन्हेगारी जगत हादरून गेलंय.

रक्ताच्या थारोळ्यात पडून होता अनवर

गोव्यातील गुन्हेगारी जगतात मोठा दबदबा असलेल्या अनवर शेख उर्फ टायगर याची शेजारील कर्नाटक राज्यात शिर्सी येथे दिवसाढवळ्या हत्या झालीए. काही महिन्यांपूर्वी फोतोर्डा आर्ले येथील जंक्शनवर त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्यात तो बालंबाल बचावला होता. पोलिसांनी त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी रिकी होर्णेकर याला अटक केली होती. याप्रकरणी इतर दोघे फरार झाले होते. गोव्यात बचावलेल्या टायगरची अखेर कर्नाटकात गेम करण्यात त्याच्या शत्रूंनी यश मिळवलंय. कुऱ्हाडीच्या शस्त्राने त्याच्या अंगावर घाव घालून त्याची निर्घुण हत्या करण्यात आलीए. भर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात त्याचे प्रेत पडल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. त्याच्या हत्येची माहिती गोवा पोलिसांना मिळाली असून ते पुढील तपास करत आहेत.

कुणी केली हत्या?

कुख्यात गुंड अनवर शेखचं नाव अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये घेतलं जातं. अनेकदा त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. फक्त गोव्यातच नव्हे, तर गोव्याबाहेरी आपल्या उपद्रवी कारनाम्यांमुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, अनवर शेखवर यापूर्वी झालेला जीवघेणा हल्ला आणि आत्ता त्याची झालेली हत्या यामुळे अनेक सवाल उपस्थित झालेत. या हत्येचं नेमकं कारण काय? या हत्येमागचा मुख्य सूत्रधार कोण?, या प्रश्नांची उत्तर पोलिस तपासातूनच समोर येतील.

हेही वाचा – अनवर शेखला ठार करण्यामागचं ‘हे’ आहे कारण?

बलात्कार, अपहरण, जीवे मारण्याच्या धमकी देणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारामारी, दरोडा, घरफोडी, चोरी, लैंगिक शोषण, खंडणी वसुली, बेकायदा जमाव करणे, प्राणघातक हल्ला करणे अशा सुमारे २६ गुन्हे दाखल असलेल्या मडगाव येथील कुख्यात गुंड अन्वर उफ टायगर शेख याचा हावेरी सवनुरु येथे अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. कर्नाटकातील हावेरी तालुक्यातील सवनुरु हे गुंड अन्वरचे जन्मठिकाण असून काही दिवसांपासून तो त्याठिकाणीच वास्तव्यास होता. रविवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींकडून गुंड अन्वर याच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अन्वरचा जागीच मृत्यू झाला. कर्नाटकातील काही गुंडांशीही अन्वरचे संबंध चांगले नव्हते. काही लोकांकडून त्याने पैशांची मागणीही केली होती. त्यातूनच हा हल्ला झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याआधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी याआधीच अन्वरला दक्षिण गोव्यातून तडीपारीची कारवाई केली होती तर राज्यातून तडीपार करण्याची प्रक्रियाही २०१९ मध्ये करण्यात आली होती. कोलवा, मडगाव, फातोर्डा, कुडचडे ठाण्यात त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जमाव करून दंगा करणे, प्राणघातक हल्ला अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय चोरी, बलात्कार, अपहरण, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, दरोडा, घरफोडी, मारण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. यातील काही गुन्ह्यांचे खटले सुरू आहेत तर काहींची सुनावणी झालेली आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!