गोव्याचा बिहार होतोय का? बोगमळोत एकावर गोळीबारानं खळबळ

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

वास्को : राज्यातील गुन्हेगारी विश्वाचा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर येऊ लागला आहे. बलात्कार, अपहरण, हत्या, चोरी या सारख्या घटना एकीकडे काही दिवसांपूर्वी वारंवार समोर येत असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. दक्षिण गोव्यातील एकावर गोळीबार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांकडून सध्या अधिक तपास केला जातो आहे.

धक्कादायक घटना

दक्षिण गोव्यातील वास्कोजवळ असलेल्या बोगमळो येथे राहणाऱ्या एका रहिवाशावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ज्याच्यावर गोळीबार करण्यात आला त्याचं नाव अमर नाईक असल्याचं कळतंय. गोळीबारात अमर नाईक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चिखली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहेत. अमर नाईक हे न्यूवाडे वास्को इथंले रहिवासी आहेत. बोगमळो येथे सागर एन्क्लेव्ह इथे इथं त्यांच्यावर झालेल्या गोळीबारानं एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर रेंट ए कारमधून आले होते असा संशय असून एक रेंट ए स्वीफ्ट कार अडगळीत सापडल्याने पोलिस तिथे दाखल झाले आहेत. पोलिसांनी या ठिकाणी नाकाबंदी केली असून वाहनांची तपासणी सुरू केलीए.

कायद्याचा धाक आहे की नाही?

अमर नाईक यांच्यावर कुणी हल्ला केला हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यानंही कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केले होते. दरम्यान, आता झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा हाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून नेमक्या कोणत्या कारणातून हा सगळा प्रकार घडला, हे लवकरच स्पष्ट होईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!