पालिका निवडणुकांच्या तारखा जवळपास निश्चित, ‘या’ तारखेला मतदान?

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : झेडपीनंतर राज्यात पालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राज्यात पालिकेच्या निवडणुका कधी होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. महत्त्वाचं म्हणजे पालिकेच्या निवडणुका कधी होणार, याची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. लवकरच ही तारीख घोषित केली जाईल अशी शक्यता आहे. २६ किंवा २७ फेब्रुवारीला आचारसंहिता लागू केली जाईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तर २० मार्चला पालिका निवडणुकांसाठीचं मतदार पार पडेल, असंही सांगितलं जातंय. याबाबतचा प्रस्तावही देण्यात आल्याची माहिती मिळतेय. निवडणूक आयोगही पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागलंय.

२६ फेब्रुवारीला अपात्र आमदारांबाबत निर्णय सभपाती घेण्याची शक्यताय. त्याच दिवशी आचारसंहिता लागू होण्याची शक्यात असल्याचंही जाणकार सांगतात. २० मार्चला मतदान झाल्यानंतर २२ मार्चला मतमोजणी पार पडण्याचाही अंदाज व्यक्त केला जातो आहे. येत्या १५ दिवसांच्या आत याबाबत महत्त्वाची घोषणा होऊ शकते. दरम्यान, आचारसंहिता लागू होण्याआधी शक्य तेवढी कामं करुन घेण्याच्या सूचनाही मंत्र्यांना देण्यात आल्याचं कळतंय.
हेही वाचा – नाराज भाजप नगरसेवकांबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
५ फेब्रुवारीला राज्यातील पालिकांचं वॉर्डनिहाय आरक्षणही जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर एकूण राज्यात अस्वस्थता आणि नाराजीचा सूर वेगवेगळ्या पालिकांमध्ये दिसून येतो आहे. दरम्यान, आता या राजकीय घडामोडींना आणखी वेग येईल, या शंकाच नाही.
हेही वाचा –
कुणासाठी कोणता वॉर्ड आरक्षित, वाचा सविस्तर
पालिका आणि पंचायत पोटनिवडणुका एकत्रच
ज्येष्ठतेत फेरबदल! मॉविन्ह चौथ्या तर मायकल अखेरच्या स्थानी