पुन्हा २०० पेक्षा जास्त नव्या रुग्णांची राज्यात भर! परिस्थिती चिंताजनक, पण कोविड केअर सेंटर ओस

दिवसभरात राज्यात दोघांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. राज्यात शनिवारीही पुन्हा दोनशेपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येते आहेत. राज्यात शनिवारी २१९ नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर आतापर्यंत एकूण ८३४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्याच्या घडीला राज्यात १ हजार ९८० सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

रिकव्हरी रेटवर परिणाम

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्याच्या रिकव्हरी रेटवही परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. राज्यास शनिवारचा रिकव्हरी रेट हा ९५.२१ टक्क्यांवर आला आहे. शनिवारी एकूण १५१ रुग्ण कोरोनातून बरे झालेत. तर शनिवारी एकूण २ हजार ६२ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यांचे अहवाल येणं बाकी आहे.

हेही वाचा – दुसरी लाट नाही तर काय? 24 तासांत तब्बल 90 हजार नवे रुग्ण, 250पेक्षा जास्त मृत्यू

कोविड केअर सेंटर रिकामीच?

दरम्यान, सक्रिय रुग्णसंख्या वाढत असली तर लोकं घरीच उपचार घेणं पसंत असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात रुग्णसंख्या आणि रुग्णवाढ चिंताजनक असली तर कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होण्याला फारशी पसंती मिळत नसल्याचं वास्तव आकडेवारीतून उघड झालं आहे. उत्तर गोव्यात 1044 कोरोना रूग्ण असले तरी कोविड केअर सेंटर मात्र रिकामीच असल्याचं समोर आलंय. दक्षिणेत 936 कोरोना रूग्ण असले तरी केवळ 36 रूग्ण कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असल्याचं समोल आलंय. त्यामुळे घरच्याघरीच उपचार घेत असलेल्यांची संख्या जास्त असल्याचं अधोरेखित झालं आहे. दरम्यान, रुग्णालयात वेळीच उपचार न घेतल्यानं मृत्यूचं प्रमाण वाढेल, अशीही भीती व्यक्त केली जाते आहे.

corona death 800X450

कोणत्या कोविड सेंटरमध्ये किती रुग्ण?

मडगाव २१० रुग्ण
पणजी १९२ रुग्ण
म्हापसा १०३ रुग्ण
कांदोळी १५१ रुग्ण
पर्वरी १८३ रुग्ण
फोंडा १४५
वास्को ११८

हेही वाचा – हृदयद्रावक! अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त! आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत

डिचोलीतही चिंता

कोणतेही नियम न पाळता डिचोली तालुक्यात सर्रासपणे सर्व व्यवहार चालू असून त्यामुळे कारोनाची घुसखोरी पुन्हा सुरू झाली आहे. शनिवारी डिचोली तालुजतात २६ नवे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. डिचोली १३, मये ५ तर साखळीत ८ रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. सध्या तालुक्यात ६२ कोविड रुग्ण असून रुग्ण संखया झपाट्याने वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लाऊड स्पीकरवर जागृती करण्यात आली.

उपजिल्हाधिकाऱ्यांनी कडक आदेश जारी करून मास्क व इतर सुरक्षितता घेण्याचे आवाहन केलं आहे. मात्र लोक नियम पाळताना दिसत नाहीत. नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी नगरवासीयांना आवाहन करताना खबरदारी घेण्याचे तसेच आकारवन बाहेर फिरू नका सर्व ती काळजी घ्या असे आवाहन केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!