Breaking | अर्थसंकल्पीय अधिवेशाची तारीख ठरली! 24 मार्चचा मुहूर्त

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपले निर्णय सांगितले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन कधी होणार, याची तारीख जाहीर केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून मार्च महिन्याच्या 24 तारखेला अधिवेशन होणार आहे.

assembly

मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन नेमकं किती वेळ चालणार याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे 24 मार्चपासून चालणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन किती दिवस सुरु राहतं, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

आणखी कोणते निर्णय?

अर्थसंकल्पीय अधिवेशनासोबत इतरही महत्त्वाचे निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले. पीडब्ल्युडीच्या थकीत पाणी बिल भरण्यासाठीच्या ओटीएस योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा विषय हिवाळी अधिवेशनात गाजला होता. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वातंत्र सैनिकांच्या 24 मुलांना या महिन्यात पूर्णवेळ नोकरी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर इतरांना गोवा ह्युमन रिसोर्समध्ये सामावून घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे. सर्वसाधारपणे एकूण 220 जणांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे नोकरी दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. दरम्यान, यासंदर्भातल्या योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे.

कॅसिनोला मुदतवाढ

मांडवी नदीमध्ये असणाऱ्या कॅसिनोलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. त्यामुळे आता पुढच्या 6 महिने मांडवी नदीतील कॅसिनोला दिलासा मिळालाय. सहा महिन्यानंतर आता यावर पुन्हा निर्णय काय घेतला जातो, हेही पाहणं महत्त्वाचंय.

casino 800 450

वीज बिलांसाठीच्या ओटीएसलाही मुदतवाढ

राज्यात अनेकांनी वीजबिलं थकवली आहेत. त्यांची वसुली करण्याचाही प्रमुख मुद्दा राज्य सरकारसमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर वीज बिलांसाठीच्या वन टाईम सेटलमेन्ट योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, 3 महिने बिलं थकवलेल्यांवर कारवाई करण्यास आधीच वीज विभागानं सुरुवात केली आहे. त्यामुळे आता येत्या काळात या ओटीएस योजनेद्वारे किती वसुली होते, हे पाहणं महत्त्वाचंय. हेही वाचा -30 टक्के घरांची वीज तोडली! बिलं थकवल्याचा फटका, तुम्ही बिल भरताय ना?

मंत्रिमंडळ निर्णयः
1) 24 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यासाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव.
2) मांडवीतील कॅसिनोची 6 जहाजे आणखी 6 महिने तिथेच राहतील.
3)स्वातंत्र्य सैनिकांच्या 24 मुलांना याच महिन्यात नोकरीची नियुक्ती पत्रे. इतर 230 जणांना गोवा मनुष्यबळ विकास महामंडळात समावून घेणार.
4) डॉ.सुखाजी नाईक यांची गोवा लोकसेवा आयोगावर सदस्य म्हणून नियुक्ती.

त्याचप्रमाणे एफआरची क्लेमबाबतही सरकारनं कोणता निर्णय घेण्यात आला आहे, याची विचारणा करण्यात आली. त्यावरही मुख्यमंत्रांनी एफआरसीसाठी मुदतवाढ देणार असल्याचं म्हटलंय. याआधी ठरवण्यात आलेल्या मुदतीत एफआरची प्रक्रिया पूर्ण होणं निव्वळ अशक्य असलाचा सूर उमटला होता. गोवनवार्ता लाईव्हनंही याबातचा मुद्दा लावून धरला होता. अखेर आता एफआरलाही मुदतवाढ देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा –

कुख्यात गुंड टायगरला जीवे मारण्यामागचं कारण ‘हे’ आहे?

Viral | Ye mai hu.. ye Hamari Car Hai.. Aur कोण आहे ती तरुणी?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!