BREAKING | केंद्राचा मोठा निर्णय! 1 मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांचं कोरोना लसीकरण

पुढच्या दहा दिवसांत सुरु होणार लसीकरण

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : एक अत्यंत महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणासाठी आधी फक्त ४५ किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांनाच लस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आताच हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलाय. यामुळे कोरोना लसीकरणाचा मोठा टप्पा पार होणार आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयमुळे कोरोनाला रोखण्यासाठीही एक महत्त्वाची मोहीम असेल, असा विश्वास संपूर्ण देशभरातून व्यक्त केला जातो आहे.

हेही वाचा – राज्यात कोरोना रुग्णवाढ होत असताना पेडण्यात अंदाधुंद दगडफेक आणि लाठीचार्ज झाला

देशात सर्वाधिक लोकसंख्या तरुणांचीच

भारतात सर्वाधिक लोकसंख्या ही तरुणांची आहे. अनेकांनी तरुणांना लस देण्याची मागणी केली होती. दरम्यान, आता तीन महिन्यानंतर का होईना, पण केंद्रानं महत्त्वाचा निर्णय तरुणांना दिलासा दिलाय. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. दरम्यान, सर्वाधिक रुग्णसंख्या सोमवारी संपूर्ण देशात नोंदवण्यात आली होती. त्यानंतर दिवसभर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून कोविड परिस्थितीचा आढावा घेत होते. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी तज्ज्ञ डॉक्टरांशीही चर्चा केली होती. त्यानंतर काही तासांच्या अंतरानं कोरोना लसीबाबतची महत्त्वाचा निर्णय केंद्रानं घेतल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, १८ वर्षांवरुन सगळ्यांचं लसीकरण कसं केलं जाणार आहे, हे पाहणं महत्त्वाचंय. त्यासाठी कोरोना लसींचा साठा, वितरण या सगळ्या गोष्टी कसा असतील, हे देखील थोड्याच दिवसांत समोर येईल. त्यामुळे पुढत्या १० दिवसांत आता देशासह राज्यात तरुणांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.

हेही वाचा – Video | कोरोना ब्रेकिंग ! 17 मृत्यू, 940 नवे रुग्ण, याहीपेक्षा चिंताजनक आकडेवारी ‘ही’ आहे

corona update

विक्रमी रुग्णवाढ

गेल्या २४ तासांत राज्यात २ लाख ७३ हजार ८१० नवे रुग्ण आढळून आले. तर तब्बल १६०० पेक्षा जास्त जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. १ हजार ६१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर १ लाख ४४ हजार १७८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंत देशात १ लाख ७८ हजार ७६९ रुग्ण दगावलेत. तर एकूण १२ कोटी ३८ लाख ५२ हजार ५६६ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

संपूर्ण देशात गेले काही दिवस सातत्यानं रुग्णवाढ ही अडीच लाखापेक्षा जास्त होताना पाहायला मिळतेय. आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, देशात रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा ८ टक्क्यांवर वाढून १६ टक्के झालाय. हा वेग संपूर्ण देशाच्या आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानं वाढवतोय. त्यामुळे मास्क घालणं, आणि सोशल डिस्टन्सिंग मेन्टेन करणं, याला पुन्हा महत्त्व प्राप्त झालंय.

हेही वाचा – Lockdown? | संपूर्ण देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतं का? या आहेत 5 शक्यता

तरुणांना सर्वाधिक धोका?

दरम्यान, भारतात कोरोना विषाणूने तरुणांना आपल्या विळख्यात घेतल्याचं एका अहवालात समोर आलं होतं. ३ एप्रिल 2020 रोजी देण्यात आलेल्या एका वृत्तानुसार भारतात आतापर्यंत ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ६० टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आकडेवारीनुसार १ हजार ८०१ रुग्णांपैका ३९१ म्हणजेच २२ टक्के रुग्ण ३० ते ३९ वर्षे वयोगटातील आहेत. यानंतर, ३७६ म्हणजे २१ टक्के २० ते २९ वर्षांच्या दरम्यान आहेत. तर १७ टक्के संक्रमित लोक हे ४० ते ४९ वर्षांचे आहेत. यापूर्वी चीन आणि इटलीसारख्या इतर देशांकडून येणाऱ्या अहवालात कोरोना विषाणूमुळे बळी पडलेल्या वृद्धांची संख्या सर्वाधिक असल्याचे म्हटलं होतं.

परंतु भारतात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे रुग्ण केवळ १७ टक्के आणि ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांपैकी केवळ २ टक्के रुग्ण कोरोना विषाणूमुळे बाधित आहेत. १ एप्रिल पर्यंत ३ टक्के म्हणजेच ४६ प्रकरणे नोंदली गेली ज्यात संक्रमित रूग्णाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की आतापर्यंत तरुण लोक असा विचार करीत होते की त्यांना या आजाराचा कमी परिणाम होईल. परंतु ते गंभीर आजारी पडू शकतात आणि मृत्यूही होऊ शकतो.

गोव्यात सोमवारी कोरोनाचे १७ बळी

देशपातळी प्रमाणाचे गोव्यातही कोविडमुळे मृताच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १५ एप्रिलपासून गोव्यात कोविडमुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत धक्कादायक वाढ झाली आहे. सोमवारी १९ तारखेला तब्बल १७ जणांचा मृत्यू झालाय तर ९४० नवे रुग्ण सापडले आहेत. सोमवारी संध्याकाळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी पत्रकार परिशद घेऊन राज्यातील आरोग्य यंत्रणेबाबत माहिती दिली. राज्यात आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असला तरी सरकार परिस्थिती हाताळण्यासाठी पुर्णपणे सक्षम असल्याचे मंत्री राणेंनी सांगितलं.

खाजगी रुग्णालयात ४० टक्के खाटा आरक्षित होणार

राज्यात सरकारी इस्पितळांमध्ये सरकार कोविड रुग्णांसाठी सर्वतोपरी सोयी उपलब्ध करुन देत आहे. राज्यातील खाजगी इस्पितळांमध्ये कोविड रुग्णांसाठी खाटांचे कमीत कमी ४० टक्के आरक्षण लागू करणार असल्याची महत्वाची माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंनी सोमवारच्या पत्रकार परिशदेत दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!