धाडसी निर्णय ! पतीच्या पार्थिवाला पत्नीकडून मुखाग्नी

बांदोडा उंडीर येथील रोहिदास नाईक यांचे निधन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : फोंडा तालुक्यातील बांदोडा उंडीर येथील रोहिदास नाईक (६२) यांचे शुक्रवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी निधन झाले. पार्थिवाला पुरुषाकडून अग्नी देण्याची परंपरा असताना रोहिदास नाईक यांच्या पार्थिवाला त्यांची पत्नी रोशनी यांनी अग्नी दिला. त्यांनी उचललेल्या या धाडसी पावलाचे कौतुक केले जात आहे.
हेही वाचाः’या’ राज्यात लवकरच समान नागरी कायदा…

सामाजिक परिवर्तनाचे सर्व स्तरातून कौतुक

रोहिदास नाईक यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी फोंडा मुक्तीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहिदास यांना मुलगा नसल्याने व पुतण्या विदेशात असल्याने त्यांची पत्नी रोशनी यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. पुरुषाकडून पार्थिवाला अग्नी देण्याच्या पारंपरिक पद्धतीला त्यांनी फाटा देत स्वत: मुखाग्नी दिला. या सामाजिक परिवर्तनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हेही वाचाःNew Year 2023: नव्या २०२३ वर्षांत असणार ‘इतक्या’ सुट्ट्या, जाणून घ्या…

निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त

रोहिदास नाईक हे माजी क्रिकेटपटू होते. तसेच उत्तम भजनी कलाकार, पंच सदस्य तसेच अनेक संस्थांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंत्यसंस्काराला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.
हेही वाचाःGoa Teacher Recruitment : रजेवरील शिक्षकांच्या जागी आता कंत्राटी शिक्षक, अशी असेल शिक्षक भरती प्रक्रिया…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!