मल्लिकार्जुन महाविद्यालयात ऑनलाईन व्याख्यान

कार्यक्रमाला शंभर हून अधिक श्रोत्याची उपस्थिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो:बा. भ. बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा जन्म इ.स. १९१० मध्ये गोव्यातील कुडचडे गावी झाला. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर गोव्यातील शाळेत त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला, पण पुढे त्यांची आकाशवाणीत अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.बा. भ. बोरकर यांनी एक प्रसिध्द प्रतिभावंत कवी म्हणून ख्याती मिळवली. निसर्ग आणि स्त्री-सौंदर्य यासंबंधीच्या विविध अनुभवांचा प्रत्ययकारी आविष्कार त्यांच्या काव्यातून धडतो. ‘प्रतिभा’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिध्द झाले. काव्याप्रमाणेच कादंबऱ्या आणि लघुकथाही त्यांनी लिहिल्या. कोकणी भाषा हा बोरकरांचा अस्मितेचा आणखी एक विषय होता. त्यांनी कोकणी भाषेतूनही लिखाण केले. कोकणीला स्वतंत्रभाषेचा दर्जा मिळावा, असा त्यांचा आग्रह होता.

गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता, बोरकरांना गोव्याविषयी आत्यंतिक प्रेम होते. हे, ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ या कवितेतून व्यक्त होते माझ्या गोव्याच्या भूमीत,गड्या नारळ मधाचेकड्या कपारी मधोनी,घट फुटती दुधाचे

श्री मल्लिकार्जुन आणि श्री. चेतन मंजु देसाई महाविद्यालय काणकोणच्या मराठी विभागाद्वारे सुप्रसिध्द गोमंतकीय मराठी कवी बा. भ. बोरकर यांच्या जन्मदिनानिमित्त सोमवारी दिनांकः ३० नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२.१५ ते १.०० वाजता ई-व्याख्यान आयोजित केलेलं.या व्याख्यानाचा विषय ‘बा. भ. बोरकर यांची कविता’ असा होता. या विशेष कार्यक्रमात वक्ते प्रा. विनय बापट उपस्थित होते. प्रा. विनय बापट गोवा विद्यापीठच्या मराठी विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

विनय बापटांनी आपल्या व्याख्यानात बोरकरांची काव्यमहती सांगितली,बोरकर हे भारतीय परंपरेशी एकरुप असलेले कवी आहेत,अध्यात्मिक मनोधारणा असलेल्या वृत्तीमूळे अध्यात्मिक काव्यधारा हा बोरकरांच्या काव्याचा पाया आहे असंही त्यांनी म्हटलयं.बोरकरांचे काव्य हे श्रध्देतून निर्माण झालेले आहे,बोरकरांचे निसर्गाप्रती असलेलं प्रेम अगणित आहे.मराठी बरोबर कोकणीलाही बोरकरांचे महत्वाचे योगदान आहे, बोरकरांची काव्य हे दिव्यत्वाचा शोध घेणारे आहे असं बापट यांनी म्हटलंय.

या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला,यावेळी प्राचार्य, डाॅ. मनोज कामत ,प्रा. प्दिप्ती फळदेसाई व इतर उपस्थित होते, तसेच या कार्यक्रमाला शंभर हून अधिक श्रोत्याची उपस्थिती होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.