बलात्कार प्रकरणातील तेजपालला हायकोर्टाची नोटीस

उत्तर देण्यासाठी दिली 24 जूनपर्यंतची वेळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी तरुण तेजपालची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून 21 मे रोजी म्हापसा जिल्हा अतिरिक्त आणि सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. याला आव्हान देणारी फौजदारी याचिका राज्य सरकारने हायकोर्टात दाखल केली होती आणि ती मान्य करण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठला ‘प्रथम दर्शनी तथ्य’ सापडलं आहेत. येत्या 24 जूनपर्यंत परत उत्तर देण्यासाठी तरुण तेजपाल यांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे.

हेही वाचाः हायकोर्टानं तरुण तेजपालप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली, २ जूनला काय होणार?

24 जूनपर्यंतची वेळ

न्यायमूर्ती एस.सी. गुप्ते यांनी तेजपाल यांना गोवा सरकारच्या याचिकेवर नोटीस बजावली. न्यायमूर्ती गुप्ते यांनी तेजपाल यांच्या सुटकेवरील सत्र न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध गोवा सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीसाठी 24 जूनची मुदत दिली. हायकोर्टाने रेजिस्ट्री विभागाला या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे सत्र न्यायालयातून घेण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचाः तरुण तेजपालच्या विरोधात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी

फिर्यादी पक्षाच्या बाजूचा निर्णयात समावेश नाही

गुप्ते म्हणाले, तिने (पीडित) प्रतिक्रिया कशी दिली याबद्दलचा हा निर्णय आहे. यावर काही निरीक्षणे आहेत. हा प्रकार बलात्कार पीडितांसाठी नियमाप्रमाणे आहे. हायकोर्टाने म्हटलं आहे की फिर्यादी पक्षाच्या बाजूचा या निर्णयामध्ये समावेश केलेला नाही. गुप्ते म्हणाले की, केसचा सारांश आणि नंतर पीडितेचा पुरावा आणि साक्षीदारांची विधानं विचारात घेतल्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे.

हेही वाचाः तरुण तेजपाल प्रकरणातील निकाल दुर्दैवी

पुढील सुनावणीत सर्व बाबींवर चर्चा

यासंदर्भात कोर्टाने म्हटलं आहे की, सुटकेच्या विरोधात दाखल केलेल्या अपीलचा विचार करण्याच्या दृष्टीने ही बाब प्राथमिक असल्याचं दिसतं. प्रतिवादी (तरुण तेजपाल) यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले असून 24 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितलं. हायकोर्टाने म्हटलं आहे की पुढील सुनावणीच्या निर्णयामध्ये न्यायालयात नमूद केलेल्या या गोष्टींसह इतर सर्व बाबींवर ते चर्चा करतील.

हेही वाचाः तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता

‘अत्यंत अशक्य’

गोवा सरकारचा पक्ष मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सत्र न्यायालयाने दिलेल्या 527  निकालाचे काही भाग वाचून काढेस्तोवर हायकोर्टाच्या खंडपीठाने ही निरीक्षणे केली. यात पीडित मुलीच्या वर्तनाचा (कथिन घटनेदरम्यान आणि नंतर) उल्लेख आहे. सॉलिसिटर जनरल मेहता यांनी निकालाचे हे भाग वाचताना सांगितले की हे वर्णन ‘अत्यंत अशक्य’ आहे.

हेही वाचाः तरुण तेजपाल खटल्याचा अंतिम निवाडा आज, काय लागणार निकाल?

खटला कोणावर?

मेहता म्हणाले, पीडिता ही योगा प्रशिक्षण घेतलेली हुशार महिला आणि शारीरिकदृष्ट्या बळकट असल्याने ती स्वतःवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला रोखू शकली असती, असं या निकालात म्हटलं आहे. ते म्हणाले, खटला कोणावर सुरू आहे हेच समजत नाही. संपूर्ण निकाल असा आहे जणू पीडित मुलीवर कारवाई होत आहे. पीडितेच्या लैंगिक इतिहासावर इतक्या चर्चेची काय आवश्यकता आहे. जेव्हा आरोपीचा वकील पीडितेला सतत लाज आणत होता तेव्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मूक प्रेक्षक बनले होते, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरलने केला.

हेही वाचाः तरुण तेजपाल खटल्याचा आजचा अंतिम निवाडा पुढे ढकलला, 21 मे रोजी निकाल

2013 ची घटना

21 मे रोजी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश क्षमा जोशी यांनी तहलकाचे माजी मुख्य संपादक तेजपाल यांना या प्रकरणात निर्दोष सोडलं होतं. ही घटना नोव्हेंबर 2013 मधली आहे, जेव्हा गोव्यातील एका कार्यक्रमात भाग घेताना पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपालवर त्यांच्या तत्कालीन सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने या महिलेच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले होते

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!