तरुण तेजपालच्या विरोधात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी

लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून झाली होती निर्दोष मुक्तता; गोवा सरकारने हायकोर्टात घेतली होती धाव

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी तरुण तेजपालची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून 21 मे रोजी म्हापसा जिल्हा अतिरिक्त आणि सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र हा निकाल दुर्दैवी असल्याचं म्हणत गोवा सरकारने मुंबई हायकोर्टात धाव घेत या निकालाविरुद्ध याचिका दाखल केली होती. याचा निकाल गुरुवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे.

हेही वाचाः तरुण तेजपाल प्रकरणातील निकाल दुर्दैवी

आरोपाचं समर्थन करणारे पुरावे नाहीत

नोव्हेंबर 2013 मध्ये घडलेल्या या प्रकरणाचा निकाल 21 मे 2021 रोजी म्हापसा जिल्हा अतिरिक्त आणि सत्र न्यायालयात निवाडा झाला. न्यायाधिश क्षमा जोशींनी या आपल्या विस्तृत लिखित आदेशात म्हटलं की पुराव्यांवर विचार केल्यानंतर आरोपीची निर्दोष मुक्तता केली जाते. कारण तक्रारदार मुलीने केलेल्या आरोपांचं समर्थन करणारे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. 500 पानांच्या आदेशात न्यायालयाला असं दिसून आलं की तपास अधिकारी किंवा आयओ (गुन्हे काशा अधिकारी सुनिता सावंत) यांनी 8 वर्षं जुन्या खटल्याच्या महत्त्वपूर्ण बाबींवर चौकशी केली नाही. न्यायमूर्ती क्षमा जोशी म्हणाल्या की, बलात्कार पीडित मुलींबरोबरच लैंगिक अत्याचारातील खोट्या आरोपीलाही समान संकटांचा सामन करावा लागू शकतो तसंच अपमानसोबत त्याचं नुकसान होऊ शकतं.

हेही वाचाः तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता

सीसीटीव्ही फुटेज आणि फिर्यादी मुलीच्या विधानामध्ये विरोधाभास

म्हापसा जिल्हा अतिरिक्त आणि सत्र न्यायालयात पोलिस तपासातील त्रुटींकडे लक्ष वेधताना सांगितलं की निःपक्षपाती चौकशी हा आरोपीचा मूलभूत अधिकार आहे. परंतु तपास अधिकाऱ्यांनी तपास करताना चूक केली. कोर्टाने असं म्हटलं की तपास अधिकाऱ्याने हॉटेलच्या 7 व्या ब्लॉकच्या पहिल्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या संदर्भात महत्त्वपूर्ण पुरावा नष्ट केला आहे, जो आरोपी निर्दोश असण्याचा स्पष्ट पुरावा होता. हॉटेलच्या आतील काही सीसीटीव्ही फुटेजसोबत छेडछाड केल्याची शक्यता कोर्टाने नाकारली नाही. म्हापसा जिल्हा अतिरिक्त आणि सत्र न्यायालयाने म्हटलं की सीसीटीव्ही फुटेज आणि फिर्यादी मुलीच्या विधानामध्ये विरोधाभास असल्याचं आईओने मान्य केलं आहे, तरीही तपास अधिकाऱ्याने पूरक स्टेटमेंट नोंदवलेलं नाही.

हेही वाचाः तरुण तेजपाल खटल्याचा अंतिम निवाडा आज, काय लागणार निकाल?

पीडित महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढणार

म्हापसा जिल्हा अतिरिक्त आणि सत्र न्यायालयाने केलेल्या या निवाड्याविरोधात गोवा सरकारने मुंबई हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी म्हटलंय की पीडित महिलेला न्याय मिळेत नाही तोपर्यंत सरकार ही केस लढणार.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!