शापोरा नदीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह…

कोलवाळ पोलिसांकडून पुढील तपास सुरू

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : रेवेडा येथे शापोरा नदी पात्रात ३० ते ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा वाहून आलेला मृतदेह सापडला आहे.
हेही वाचाःविक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट…

या मृतदेहावर कोणतीही जखम नाही

कोलवाळ पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला आहे. मोखरयवाडा गणेश कोणीकडे आलेला हा मृतदेह ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. त्यांनी घटनेची माहिती लगेच पोलिसांना दिली. कोलवाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह नदीतून बाहेर काढला. या मृतदेहावर कोणतीही जखम आढळून आली नाही.
हेही वाचाःरोहित कदम नवे क्रीडा संचालक…

कोलवाळ पोलिसांकडून पुढील तपास सुरू

नुकताच नदीत तो बुडाला असावा, तो पिर्ण किंवा वझरी भागातील असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कोलवाळ पोलिसांनी त्यांचा फोटो राज्यातील सर्व पोलीस स्थानकांना पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचाःविनोदी भूमिकांमध्येच सर्वाधिक मेहनत : वरुण शर्मा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!