तेरेखोल नदीत मृतदेह सापडल्यानं खळबळ

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : तेरेखोल नदीत मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. केरी, तेरेखोल नदीत तरंगत असलेल्या स्थितीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडलाय. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे, याचा शोध सध्या सुरु आहे.

केरी तेरेखोल इथं मृतदेह असल्याची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी अधिक तपासासाठी हा मृतदेहस बांबोळी येथील जीएमसी रुग्णालयात पाठवला आहे. तिथे या मृतदेहाचा पोस्टमॉर्टेम केल्यानंतर अधिक माहिती मिळण्याची शक्यताय.

हेही वाचा : पत्रादेवी चेकनाका धोकादायक; सोयी सुविधांचाही अभाव

30 ते 35 वयोगटातील ही व्यक्ती असल्याची माहिती मिळाली असून या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेह हा एका अज्ञात पुरुष व्यक्ती आहे. या मृतदेहाच्या गळ्यामध्ये एक ताविज होता. दरम्यान, नेमकं या व्यक्तीच्या मृत्यूचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मृतदेह सापडलेली व्यक्ती नदीतून बुडून मृत्युमुखी पडली की कुणी या व्यक्तीचा खून केला आहे का, याबाबत संभ्रम कायम आहे.

हेही वाचा : नेरुल येथे अर्भक टाकणाऱ्या संशयित वृद्धास अटक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!