मायडा नदीत आढळला मृतदेह

शुक्रवारी दुपारी आढळला मृतदेह; कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर

Goan Varta Live | प्रतिनिधी

धारबांदोडा: कुळे येथील मायडा नदीत कुजलेल्या स्थितीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर इसम पुरात वाहून गेला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचाः काही क्षणात कोसळला डोंगर

कधी सापडला मृतदेह?

कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबडीमळ येथील मायडा नदीत शुक्रवारी दुपारी हा मृतदेह आढळून आला. सदर व्यक्तीचा आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. सदर व्यक्ती ४५ ते ५० वयोगटातील असून मृतदेहावर पँट आणि टीशर्ट आहे. पोलिसांनी मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढत तो शवविच्छेदनासाठी गोमेकॉमध्ये पाठवून दिला.

हेही वाचाः कोरोना आणि म्युकरमधून बरा झालेल्या सचिन तुभेची गोष्ट

व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद नाही

सध्या कुळे पोलिस स्थानकात कोणती व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी दिली आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Entry Issue | महाराष्ट्रातून गोव्यात येता, मग गोव्यातल्यांनाही महाराष्ट्रात घ्या!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!