महालसा देवालयात नौकाविहार
उत्सव अगदी साधेपणानं संपन्न

Goan Varta Live | प्रतिनिधी
म्हार्दोळ:स्वतंत्र देवी म्हणून मोहिनीचे रूप मानली जाणारी महालसा,विष्णू देवतांची स्त्री अवतार आहे आणि म्हणून तिला महालसा नारायणी म्हणतात. वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवालय आणि अनुषंगिक पंचायत जूने म्हार्दोळ येथे रविवारी दि. ६ डिसेंबर रोजी श्रींचा नौकाविहारा (सांगोड) व दीपोत्सव कोरोनाच्या वाढत्या संसर्ग महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी व भक्तांच्या हितासाठी देवालयाच्या समितीने बैठकीत विचार विनिमय करून उत्सव अगदी साधेपणान संपन्न करण्याचे ठरवल्या प्रमाणे कमित कमी भाविकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून साजरा झाला.
सकाळी श्रींचा अभिषेक, दूपारी आरती, संध्या, ६:३० वा नौकाविहार (सांगोड)व दिपोत्सव व ७:३०वा.महाआरती असा कार्यक्रम साधेपणानं संपन्न झाला
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.