गर्दीच्या ठिकाणी रॅन्डम कोरोना टेस्ट! मुंबईत होऊ शकतं तर गोव्यात का नाही?

वाढत्या संसर्गामुळे प्रायव्हेट ऑफिसमध्ये ५०% स्टाफचा आदेश

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : कोविडचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनानं राज्यातली सर्व खासगी कार्यालयं आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आदेश निर्गमित केले आहेत. आरोग्य तसंच इतर अत्यावश्यक सेवा आणि उत्पादन क्षेत्राला यातून वगळण्यात आलं आहे.

सामाजिक अंतर राखणं सोयीस्कर होण्यासाठी, उत्पादन क्षेत्रांच्या कामाच्या पाळ्यांमध्ये वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनं घेता येईल, असंही आदेशात नमूद आहे.

नाट्यगृहं तसंच सभागृहांमध्येही ५० टक्के उपस्थिती असावी, मात्र त्यांचा वापर धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे किंवा सभांसाठी करता येणार नाही, असंही या आदेशात म्हटलं आहे. या बरोबरंच कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं मिशन टेस्टिंग राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत दररोज ५० हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष्य आहे. मिशन टेस्टिंगअंतर्गत मुंबईतले मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर रोगप्रतिकारक शक्ती तपासणी चाचण्या होणार आहेत.

मॉल्स आणि चित्रपट गृहांमधे प्रवेश करण्या आधी अँटीजेन चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परराज्यातून आलेल्या प्रवाशांकडे RT-PCR चाचणी केली असली तरी त्यांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात किंवा घरीच विलगीकरणात राहणं बंधनकारक करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिले आहेत.

दरम्यान, मुंबईत शनिवारी १ हजार ३३४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवलं. आतापर्यंत ३ लाख २३ हजार २८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३ हजार ६५ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या ३ लाख ५५ हजार ८९७ झाली आहे.

हेही वाचा – हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पिझ्झा खाणं सोडून द्याल!

मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १३१ दिवसांवर आलाय. सध्या २० हजार १४० रुग्ण उपचार घेत आहेत. काल १० रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ११ हजार ५६५ वर पोचला आहे.

मुंबईत होऊ शकतं तर गोव्यात का नाही?

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पाश्र्वाभूमीवर बीएमसीने गर्दीच्या ठिकाणी रॅन्डमली चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मॉल, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके , एसटी आगार, बाजार, उपाहारगृहे या ठिकाणी कोरोनाच्या प्रतिजन चाचण्या करण्यात येणारेत.

प्रत्येक मॉलमध्ये दर दिवशी ४०० चाचण्या करण्याचे निर्देश देण्यात आलेत. मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्यांना त्यांच्याच खर्चाने कोरोना चाचणी करावी लागणार आहे. चाचण्या करण्यास किंवा खर्च देण्यास नकार देणाऱ्यांवर साथरोग कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.

मुंबईत दिवसभरात ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयांना दर दिवशी किती चाचण्या केल्या याचा अहवाल देण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

corona 800X450

मुंबईत एकूण २७ मॉल आहेत. प्रत्येक मॉलमध्ये ४०० चाचण्यांचे लक्ष्य देण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल, परेल, बोरिवली, कुर्ला असे चार एसटी डेपो आहेत. तर छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, लोकमान्य ठिळक टर्मिनस, कुर्ला अशी 7 रेल्वे स्थानके आहेत जिथे परराज्यांतून गाड्या येतात. या ठिकाणी दर दिवशी एक हजार चाचण्या केल्या जाणार आहेत.

हेही वाचा – शनिवारी राज्यात दीडशेपेक्षा जास्त रुग्ण आणि दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रकही याच दिवशी आलं

आरोग्यमंत्र्यांनी खडसावलं!

दरम्यान, ज्याप्रमाणे मुंबई पालिकेनं निर्णय घेतला आहे, तसाच निर्णय गोव्यात होऊ शकतो का, यावरुही चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्वीट करुन बेजबाबदारपणे वागण्यांना फटकारलंय आणि कडक कारवाईचा इशाराही दिला आहे. पर्यटकांसोबत लोकांनीही खबरदारी घेणं आणि जबाबदारीनं नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. महाराष्ट्र, गुजरात कर्नाटकपाठोपाठ गोव्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे.

हेही वाचा – ट्रकच्या मागून दुचाकी घुसली, एकाचा मृत्यू

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!