वारखंड येथे रविवारी रक्तदान शिबीर

अधिकाधिक रक्तदात्यांनी उपस्थिती लावण्याचे आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : श्री शांतादुर्गा कल्चरल अँड स्पोर्ट्स क्लब-वारखंड आणि गोवा मेडिकल कॉलेज-बांबोळी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. 14 मार्च 2021, रोजी सकाळी 10 ते दुपारी 12.30 या वेळेत हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलंय. वारखंड येथील श्री शांतादुर्गा कल्चरल अँड स्पोर्ट्स क्लबच्या इमारतीत या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. जास्तीत जास्त रक्तदात्यांना या शिबिरासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन क्लबच्या कार्यकारिणीने केलंय.

या रक्तदान शिबिराला वारखंड-नागझर पंचायतीचे सर्व पंच तसंच श्री शांतादुर्गा देवस्थान समितीचे सदस्य आणि क्लबचे सदस्य यावेळी उपस्थित असतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!