‘ब्लॅक फंगस’ साथीचा रोग

अधिसूचना जारी; माहिती लपवल्यास दखलपात्र गुन्हा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्य सरकारने ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) आजाराचं साथीच्या रोगांमध्ये वर्गीकरण केलं आहे. यापुढे ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णाची माहिती डॉक्टरांना तत्काळ सरकारला सादर करावी लागणार आहे. अशा रुाणांची माहिती लपवणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हाही नोंद होऊ शकतो.

हेही वाचाः CORONA UPDATE | मोठा दिलासा! 44 दिवसांनंतर देशात कोरोनाग्रस्तांमध्ये निचांकी आकडे

आरोग्य खात्याकडून अधिसूचना जारी

आरोग्य खात्याच्या अवर सचिव गौतमी परमेकर यांनी गुरुवारी ब्लॅक फंगसचे साथीच्या रोगांत वर्गीकरण केल्याची अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेमुळे यापुढे अशा रुग्णाबाबत माहिती मिळताच खासगी किंवा सरकारी डॉक्टरांनी तत्काळ त्याची सविस्तर माहिती सरकारला देणं बंधनकारक ठरतं. अशा रुग्णांची माहिती सरकारला सादर न करणाऱ्या डॉक्टरांवर गोवा दमण आणि दीव सार्वजनिक आरोग्य कायदा, 1985 व अंतर्गत दखलपात्र गुन्हा नोंदविला जाऊ शकतो, अशी माहिती डॉ. उदय काकोडकर यांनी दिली.

हेही वाचाः पत्रकार वासु चोडणकर ठरले पहिले कोविड बळी

रोगप्रतिकारकशक्ती क्षीण झालेली रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण

राज्यात करोनाचा उद्रेक सुरू असतानाच ब्लॅक फंगसचे दहा रुग्ण आढळून आले. त्यातील उच्च मधुमेह असलेल्या आणि करोनासोबत ब्लॅक फंगसची लागण झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती पूर्णपणे क्षीण झालेली असते अशा रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण होते. राज्यात करोनाचे उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांत अशाप्रकारचे इतर आजारही आहेत. त्यामुळे ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढू शकतात. हे लक्षात घेऊन सरकारने तत्काळ त्यासंदर्भातील औषधे, इंजेक्शन उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू केल्या. शिवाय गोमेकॉतील 102 क्रमांकाचा वॉर्डही ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. देशातील विविध राज्यांमध्ये करोनाबाधितांना ब्लॅक फंगसची लागण होत असल्याचे सिद्ध झाले.

हेही वाचाः कोविडविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं

‘अँफोटेरिसिन’च्या आणखी शंभर वाईल्स मंजूर

ब्लॅक फंगसवर अँफोटेरिसिन इंजेक्शन लाभदायी ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या इंजेक्शनच्या साठ्यावर भर दिला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी या इंजेक्शनच्या आणखी 80 हजार वाईल्स सर्वच राज्यांना मंजूर केल्या आहेत. त्यांतील शंभर वाईल्स गोव्याला मंजूर झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्याला केंद्राकडून 50 वाईल्स मिळाल्या होत्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!