भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल

आमदार, नेते, कार्यकर्त्यांशी करणार चर्चा.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेने गोवा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असताना, आता भाजपने देखील निवडणुकांचं रणशिंग फुकलं आहे. भाजपने गोव्यात निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल झालेत. तर स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ आणि १५ ऑक्टोबरला गोवा दौऱ्यावर येणार आहेत. गोव्याच्या निवडणुकांसाठी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा असणार आहे.

आमदार, नेते, कार्यकर्त्यांशी करणार चर्चा

स्वतः अमित शहा गोव्यात येऊन आढावा घेणार आहेत. एक दिवस ते गोव्यात थांबतील. 14 तारखेला दिवसभर अमित शहा यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस बैठका घेऊन मग ते नागपूरला जाणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्या ते आमदार, नेते, कार्यकर्त्यांशी करणार चर्चा करणार असल्याचं समजतंय.

गोव्यात विधानसभा निवडणुकीचे वारे

४० सदस्यांच्या गोवा विधानसभेमध्ये आता भाजपाची सत्ता आहे. निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये बरीच पडझड झाली आहे. आपही यंदा गोव्यात पूर्ण ताकतीने निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेने सर्वच्या सर्व ४० जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मागची विधानसभा निवडणुकही शिवसेनेने लढवली होती. पण त्याचा उपयोग झाला नव्हता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!