भाजपाचे चाणाक्य ३० रोजी गोव्यात

आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे भाजपची प्रचारात आघाडी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: भाजपच्या विजयाचे शिल्पकार आणि राजकारणातील चाणाक्य अशी ओळख असलेले देशाचे गृहमंत्री अमित शहा भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ३० रोजी गोव्यात येणार आहेत. ते भाजपच्या उमेदवारांची भेट घेणार असून virtual राजकीय सभाही संबोधित करणार आहेत.
शहा यानी ज्या ज्या ठिकाणी राजकारणात लक्ष घातले तेथे तेथे भाजप विजयी झाला आहे.

अमित शाहांचा दौरा स्थानिक भाजपसाठी फलदायी ठरणार

भाजपच्या समोर विजयासाठी असलेल्या सर्व समस्या निकाली काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. यामुळे त्यांचा गोवा दौरा स्थानिक भाजपसाठी फलदायी ठरणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकत भाजप विजयाची कोनशिला त्यांच्या सभेने बसवली जाणार आहे.

भाजपच्या प्रचाराला मोठी गती प्राप्त होणार

अत्याधुनिक दृक-श्राव्य माध्यमांच्या सहाय्याने ते एकाच वेळी गोव्यातील चाळीसही मतदारसंघातील मतदारांना संबोधित करणार आहेत. एकेका मतदारसंघात पाच ठिकाणी त्यांच्या सभा पाहण्याची आणि ऐकण्याची व्यवस्था भाजप पक्ष संघटना करणार आहे. शहा यांच्या दौऱ्याने भाजपच्या प्रचाराला मोठी गती प्राप्त होणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज सादर करण्याचे दिवस आहेत त्यानंतर प्रत्यक्षातील प्रचाराला भाजप मोठी गती देणार आहे.

प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी भाजपने निवडले अनेक मार्ग

कोविड प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वे सध्या अंमलात असल्याने भाजपने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी अनेक मार्ग निवडले आहेत. भाजपने त्याचमुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी या माध्यमातून प्रचाराच्या एक-दोन फेऱ्या प्रत्येक मतदारसंघात यापूर्वीच पूर्ण केल्या आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!