2022 विधानसभा निवडणुकीत कमळच फुलणार!

गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंचं व्यक्तव्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल.संतोष 12 आणि 13 जुलै रोजी गोव्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी आज गोव्यात दाखल होणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. गेले काही दिवस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा गोवा दौऱ्यावर येणार असल्याच्या विविध बातम्या वृत्रपत्रातून प्रसिद्ध होत आहेत. नड्डा यांच्या गोवा दौऱ्याच्या अधिकृत तारखेची घोषणा करण्यासाठी शनिवारी भाजपकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसंच भाजपचे माजी खासदार नरेंद्र सावईकरांनी यांनी या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.

हेही वाचाः गिरी येथे दुकानात चोरी; दोघांना अटक

12 आणि 13 जुलै रोजी जे.पी. नड्डा गोव्यात

तानावडे म्हणाले, 12 आणि 13 जुलै रोजी दोन दिवस जे.पी.नड्डा गोव्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी त्यांनी विविध बैठकांचं आयोजन केलंय. पार्टीच्या राज्यातील आमदारांसोबत त्यांची एक बैठक होणार असून मंत्री, आमदार आणि खासदारांसोबत एक बैठक; मंत्र्यांसोबत एक बैठक; पार्टीची कोअर टीम, भाजप प्रदेश पदाधिकारी, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, पक्षाच्या राज्यातील मोर्चांचे अध्यक्ष आणि सरचिटणीस अशा विविध बैठका होणार आहेत. सोशल मीडिया सेल सोबत बैठकही ते घेणार आहेत.

हेही वाचाः VIDEO VIRAL | ऐकावे ते नवलच! वधूच्या डोक्यावर तोडले जातात पापड

राजेंद्र आर्लेकरांचं अभिनंदन

हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी गोव्यातून राजेंद्र आर्लेकरांची नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला तानावडेंनी त्यांचं अभिनंदन केलं. पक्षाप्रति निष्ठा, प्रामाणिकपणा, केलेलं काम याच्या बळावर आजपर्यंत मनोहरभाई पर्रीकर, श्रीपादभाऊ सारखे नेते राज्यातून केंद्रात पोहोचले. प्रामाणिकपणे पक्षाचं काम केल्यास केंद्रात त्याची नोंद घेतली जाते हे राजेंद्र आर्लेकरांनी पुन्हा एकदा स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलं आहे, असं तानावडे यावेळी म्हणाले.

हेही वाचाः जीएसटीचे नेमके प्रकार किती? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

आर्लेकरांना राज्यपालपद देऊन गोव्याच्या राजकारणातून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना तानावडे म्हणाले, राजेंद्र आर्लेकरांना राज्यपालपद देण्यामागे केंद्राचा आसा काही उद्देश असेल असं आपण म्हणू शकत नाही. कुठल्या नेत्यांना कोणत्या प्रकारची जबाबदारी द्यायची हे पक्ष नेतृत्वाला चांगलं माहीत आहे, अशी स्पष्टोक्ती तानावडेंनी दिली.

हेही वाचाः Video | अप्रतिम कॅच पाहून आनंद महिंद्राही म्हणाले, ही तर सुपरवुमन

2022 विधानसभा निवडणुकीत कमळच फुलणार

6 महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर भाष्य करताना तानावडे म्हणाले, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वतःच्या बळावर जिंकून येणार हे 100 टक्के नक्की आहे. निवडणुका उद्या जरी घेण्यात आल्या तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत. दुसरं म्हणजे पत्रकार परिषदेत घोषणा करून कुणालाच पक्षाचं तिकिट मिळणार नाही. कुणाला तिकिट द्यायचं कुणाला नाही याचा निर्णय हा सर्वस्वी पक्षाचं संसदीय मंडळ घेणार आहे. अजून निवडणुकांसाठी 6 महिन्यांचा अवकाश आहे. त्यामुळे उमेदवारांविषयी अजून तसं काही ठरलेलं नाही. तसंच एकाच कुटुंबातील 4-5 जणांना भाजप तिकिट देणार नाही, असा खुलासाही तानावडेंनी केलाय.

हा व्हिडिओ पहाः

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!