भाजप समर्थक रमेश गांवकर यांचा शिवसेनेत प्रवेश

गोवा महिला आघाडी संपर्क प्रमुख रीया पाटील यांनी केलं पक्षात स्वागत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पर्ये सत्तरी येथील भाजप समर्थक रमेश गांवकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गोवा महिला आघाडी संपर्क प्रमुख रीया पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

मान्यवरांच्या उपस्थितीत केला प्रवेश

यावेळी त्यांच्यासोबत गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, सरचिटणीस मिलिंद गावस, उप राज्यप्रमुख सुभाष केरकर, उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर, बार्देश तालुका प्रमुख विन्सेंट पेरेरा, राज्य सचिव मनोज सावंत, सह कोषप्रमुख तुषार सावंत, मतदाता सर्वेक्षण समन्वयक झायगल लोबो, राज्य सचिव वंदना चव्हाण, पेडणे तालुका प्रमुख बाबली नाईक, मुरगाव तालुका प्रमुख दिपक येरम, शाखा विस्तार समिती प्रमुख राजू विर्डिकर, राज शिष्टाचार समन्वयक मारूती शिरगावकर, म्हापसा उप मतदारसंघप्रमुख रेशाद डिसुझा प्रामुख्याने उपस्थित होते.

गोवा शिवसेना पक्षातील संभाव्य उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक मध्यवर्ती कार्यालय पणजी येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात पार पडली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे मुंबईतील रणनीतीकार येणार असून पुढील आठवड्यात काही मतदारसंघात सर्वेक्षण करून रणनीती आखण्यात येणार आहे. त्यानुसारच संभाव्य उमेदवारांना कार्यक्रम देण्यात येणार आहे.

विविध समित्या स्थापन

निवडणुकांसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. खालिल प्रमाणे समित्या जाहीर करण्यात आल्या:

जाहिरनामा समिती

अध्यक्ष: मिलिंद गावस
सदस्य: सौ.रीया चांद्रे पाटील, सुभाष केरकर, सुशांत पावसकर, एलेक्सि फर्नांडिस, विन्सेंट पेरेरा, बाबली नाईक, गुरूदास गांवकर

उमेदवार निवड समिती

अध्यक्ष: बाबूराय नाईक
सह अध्यक्ष: झायगल लोबो

राज शिष्टाचार समिती

अध्यक्ष: सुभाष केरकर
सह अध्यक्ष: मारूती शिरगावकर
सह अध्यक्ष: विन्सेंट पेरेरा

सर्वेक्षण समन्वय समिती

अध्यक्ष: झायगल लोबो
सह अध्यक्ष: मंदार पार्सेकर

प्रचार समिती

अध्यक्ष: राजू विर्डिकर
सह अध्यक्ष: मेहबूब नालबान

लेखा समिती

सदस्य: मनोज सावंत, तुषार सावंत

पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर समिती

अध्यक्ष: सुशांत पावसकर
सह अध्यक्ष: महेश पेडणेकर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!