भाजप प्रदेशाध्यक्षांचं थिवी मतदारसंघात जोरदार स्वागत

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तानावडेंनी दिली थिवी मतदारसंघाला भेट

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाकडून प्रचाराला सुरुवात झालीये. राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी विविध मतदारसंघांना भेटी देऊन जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्ताने मतदारांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यावर तानावडे भर देत आहेत. गुरुवारी तानावडेंनी थिवी मतदारसंघाला भेट दिली आहे. येथील जे बी सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यकर्ता बैठकीस त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर, पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

हेही वाचाः लाखो पेन्शनधारकांच्या हातात अधिक पैसे येणार

थिवी मतदारसंघात तानावडेंवर पुष्पवर्षाव

गुरुवारी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचं थिवी मतदारसंघात जोरदार स्वागत केलं. तानावडेंच्या स्वागतासाठी यावेळी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. तानावडेंनी बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. भाजप कार्यकर्त्यांच्या सोबतीने बाईकवर बसून त्यांनी थिवी मतदारसंघात एक चक्कर मारली. यावेळी थिवी मतदारसंघातील लोकांनी तानावडेंवर पुष्पवर्षाव करून त्यांचं जंगी स्वागत केलं.

महिला कार्यकर्त्यांनी केलेलं स्वागत पाहून मी भारावून गेलो

आगामी निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. तसंच सर्व मतदारसंघाचा दौरा सुरू आहे. याठिकाणी आमचे पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेलं स्वागत पाहून मी भारावून गेलो आहे. हाच उत्साह आणि ऊर्जा कायम ठेवून आगामी निवडणुकीसाठी काम करा. केंद्र सरकार आणि राज्य सरकार समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार तळागाळातील लोकांसाठी काम करत असून सामान्यातील सामान्य माणसाचे जीवन उंचावावं यासाठी विविध योजना आणि उप्रकम राबविण्यात येत आहेत, असं शेट-तानावडे म्हणाले.

विरोधक गोंयकारांची दिशाभूल करत आहेत

गावागावातील कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने केलेलं काम आणि तळागाळातील लोकांसाठी असलेल्या सर्व सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचावाव्यात. राज्य सरकारने कोरोना महामारीच्या कठीण काळात चांगलं काम केलं. तसंच पक्षाचे मंत्री, आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही या काळात उत्तम काम केलं. कोरोनाची भीती अद्याप कायम आहे. जगभरातील तज्ज्ञ तिसर्‍या लाटेचा इशारा देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून कार्यरत राहावं. सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवाच शिवाय सरकारने केलेले कार्य, विकासकामे, निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा याविषयीचीही माहिती द्या. विरोधक अफवा पसरवून सरकारची नाहक बदनामी करत आहेत. आणि गोमंतकीयांची दिशाभूल करत आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी सजग राहून विरोधकांचा डाव हाणून पाडला पाहिजे. आणि लोकांना सत्य आणि तथ्य सांगावं, असं आवाहन शेट-तानावडेंनी यावेळी केलं.

एकमेकांविरोधात असलेले नेते आज एकत्र

तानावडे थिवी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना एक अजब चित्र पहायला मिळालं. कधीकाळी एकमेकांविरोधात निवडणुकीत भिडलेले थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे दोन नेते, आज थिवी मतदारसंघाचा दौरा करतेवळी एकमेकांच्या गळ्यात गळा घालून वावरताना दिसलेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दौऱ्यानंतर आता थिवीतील मतदारांसाठी हे चित्र चर्चेचा विषय ठरला आहे.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | POLITICS | CLASH | कार्यक्रमाला निमंत्रित न केल्यानं अ‍ॅलिना संतापल्या

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!