भाजपचे संघटन सचिव संतोष आज गोव्यात

संघटनात्मक तयारीचा घेणार आढावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष बुधवारी गोव्यात दाखल होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संतोष प्रदेश भाजपच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेणार असल्याचं समजतं.

हेही वाचाः पावसाळ्यात आहारात करा ‘या’ खास गोष्टींचा समावेश

संघटनात्मक तयारीचा घेणार आढावा

राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी दिल्लीतून सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांत करोना, पर्यावरणीय प्रश्न तसंच इतर काही समस्यांमुळे गोमंतकीय जनतेत भाजपविरोधी संतापाची लाट पसरली आहे. त्यात भर म्हणून काही मंत्री, आमदार स्वत:च्याच पक्षाला ‘घरचा आहेर’ देत आहेत. पक्षात आपले स्थान राहिले नसल्याची जाणीव झाल्याने अनेकांकडून भाजपला रामराम ठोकण्यात येत आहे. त्यामुळे संघटनात्मकदृष्ट्या भाजप मागे पडत चालल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांत समोर आले आहे. याचाच आढावा घेण्यासाठी बी. एल. संतोष गोव्यात येत असल्याची माहिती प्रदेश भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

हेही वाचाः देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा किंचित वाढ

विधानसभा निवडणुकीसाठी चाळीसही मतदारसंघांत उमेदवार निश्चित करण्याची मोहीम भाजपने हाती घेतली आहे. त्यासाठी विद्यमान आमदारांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावाही प्रदेश भाजपच्या प्रमुख नेत्यांनी घेतला आहे. संतोष यांच्यासमोर हा आढावा मांडून उमेदवार निवडीला गती देण्याचं प्रदेश भाजपने निश्चित केल्याचेही समजतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!