सावंतवाडी नगराध्यक्षांसह भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोर राज्य सरकारविरोधात केलं लक्षवेध आंदोलन

Goan Varta Live | प्रतिनिधी

सावंतवाडी : भाजपच्यावतीनं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोर महाविकास आघाडी सरकारचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लक्षवेध आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असताना देखील व्हेंटीलेटर, ऑक्सिजन बेडची कमतरता, फिजिशिअन, स्टाफचा अभाव आदींबाबत भाजपनं सरकारच लक्ष वेधलं. नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान पोलीस निरीक्षक सचिन हिंदळेकर यांनी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, केतन आजगावकर आदीं पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.

यावेळी महाविकास आघाडी सरकार, पालकमंत्री यांचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. बंद असलेले व्हेंटिलेटर सुरु करण्याबाबत तसेच ऑक्सिजनचा तुटवडा, फिजिशिअन, स्टाफचा अभाव आदींबाबत निवेदन देण्यात आलं.

यावेळी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, अँड. परिमल नाईक, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गांवकर, जि. प. सदस्य रेश्मा सावंत, सभापती निकिता सावंत, मानसी धुरी, महिला शहराध्यक्ष मोहीनी मडगावकर, नगरसेविका दिपाली भालेकर, माजी आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर, शेखर गा़ंवकर, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, दिलीप भालेकर, रविंद्र मडगांवकर, दिपक सावंत, बंटी पुरोहित, केतन आजगावकर, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!