भाजप मंडळ आंदोलन करणार, तर पेडणे ‘मगोप’चा पूर्ण पाठिंबा

मगो पक्षाचे नेते प्रवीण आर्लेकरांची स्पष्टोक्ती

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः मोपा येथील विमानतळ कंपनीबाबत आम्ही आणि पीडित शेतकरी तसंच ग्रामस्थ गेली 2 वर्षं न्यायासाठी आंदोलन करत होतो. कंपनीच्या विरोधात आवाज उठवत होतो. मात्र कंपनी, स्थानिक आमदार आणि सरकार हे आमच्या डोळ्यात धुळफेक करत होते. उशीरा का होईना पेडणे भाजप मंडळ आणि मोपा विमानतळ  परिसरातील सरपंच तसंच पंच आणि इतरांचे डोळे उघडले. तौक्ते चक्रीवादळात मोपा परिसरातील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल. त्यांच्या शेतात, विहिरीत चिखलाचं पाणी, दगड, माती गेली. त्याबद्दल पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं. स्थानिकांवर होणाऱ्या अन्यायासाठी जर भाजप मंडळ आंदोलन करणार तर पेडणे मगो पक्षाचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असेल, असं पेडण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं. पेडणे मगोने घेतलेल्या या पत्रकार परिषदेत उगवे-तांबोसे-मोप पंचायतीचे उपसरपंच सुबोध महाले बोलत होते. यावेळी पेडणे मतदारसंघाचे मगो नेते प्रवीण आर्लेकर, मगो कार्यकारिणी सदस्य सुदिप कोरगावकर, शेतकरी नारायण तुळसकर आणि रमाकांत तुळसकर उपस्थित होते.

हेही वाचाः सतत, अविरत चलना है!

कंपनीचा सी.एस आर फंड कोणाच्या खिशात?

मोपा विमानतळ कंपनी ही स्थानिकांना विश्वासात न घेता मनमानी करतेय. या अन्याया विरोधात गेली दोन वर्षं आम्ही आवाज उठवतोय. मात्र याकडे कोणी लक्ष दिलं नाही. आज सत्य परिस्थिती कळल्यानंतर अखेर त्यांना जाग आलीये, असं सुबोध महाले म्हणाले. सध्या कोरोना संकटाने नागरिक त्रस्त आहेत. अनेकांच्या जमिनी गेल्या. त्याचा योग्य तो भाव अजूनपर्यंत मिळालेला नाही. मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचं काम हाती घेतलेली कंपनी मात्र सुस्त आहे. कंपनीच्या नियमानुसार सी.एस.आर फंड हा परिसरातील तसंच जवळच्या भागातील नागरिकांसाठी विविध प्रकारे मदत देण्यासाठी असतो. मात्र तो फंड कंपनी खर्च करत नाही. कदाचित तो फंड कुणालातरी गाड्या दिल्याने कंपनी खर्च करत नसल्याचा संशय आहे. याबाबतही पेडणे भाजप मंडळ आणि इतर सरपंचांनी आवाज उठवावा, असं आवाहन महालेंनी केलं.

हेही वाचाः …अन् फुटबॉलच्या मैदानावरच एरिक्सननं जिंकला ‘गेम ऑफ लाईफ ‘

मोपा जर बाबूने आणला तर शेतकऱ्यांचे पैसे ते का अजून देत नाहीत?

मोपा विमानतळ प्रकल्प हा आपण आणला असं बाबू आजगावकर सांगतात. मात्र माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंनी त्यावेळी या प्रकल्पाला चालना देण्याचं काम केलं आहे. असं असताना बाबू आजागावकर हे आपण मोपा विमानतळ आणला असं सांगतायत. जर त्यांनी मोपा विमानळ प्रकल्प आणला, तर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्याला अजूनपर्यंत योग्य भाव बाबू का देत नाहीत? असा सवाल प्रवीण आर्लेकरांनी केलाय.

हेही वाचाः तीन अर्भकांचा तपास अजूनही गुलदस्त्यात

बाबू आजगावकरांनी स्थानिकांवर पोलीसाचा धाक दाखवू नये

मोपा विमानतळ प्रकिया आणि चांदेल पाणी प्रकल्प हे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्यामुळे झाले असल्याचे मगो कार्यकारिणी सदस्य सुदीप कोरगावकर म्हाणाले. चांदेल येथील पाणी प्रकल्प जर बाबू आजगावकर यांनी विस्तारीत केला असता, तर पेडणे तालुक्यातील पाण्याची समस्या सुटली असती, असंही कोरगावकर म्हणाले. कोरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक कार्याक्रमानिमित्त आजगावकर कोरगावात आले असता एका नागरिकाने त्यांना नोकऱ्यांबाबत प्रश्न विचारला. त्यानंतर त्या नागरिकाला पोलिसांचा धाक दाखवविण्यात आला. पेडाण्यातील नागरिकांवर आजगावकर यांनी दबाब आणू नये, असं कोरगावकर म्हणालेत.

हेही वाचाः CRIME | माजोर्डा येथे मजुराचा खून

मोपा विमानतळ प्रकल्प हा केंद्राचा

मोपा विमानतळ प्रकल्प हा केंद्र सरकारचा असून प्रत्येक वेळी बाबू आजागावकर हे आपण मोपा विमानतळ प्रकल्प खेचून आणला म्हणून सांगत आहेत. मोपा विमानतळावरसुद्धा मोठ्या प्रमाणात नोकऱ्या दिल्या, असं ते सांगतात. ज्यांना नोकऱ्या दिल्या त्यांच्या नावाची यादी आजगावकरांनी जाहीर करावी, असं आवाहन रमाकांत तुळसकरांनी केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!