राज्यात भाजप सरकारचे दिवस भरले; २०२२ मध्ये काँग्रेस सरकार स्थापणारः कामत

कुंकळ्ळीच्या सत्ताधारी नगरसेवकांनी विरोधी पक्ष नेत्यांची घेतली भेट

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: नगरपालिका मंडळाने संमत केलेले प्रस्ताव चालीस लावणं हे अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. कुंकळ्ळी नगरपालिकेतील समस्या आणि प्रश्नावर मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन, असं आश्वासन विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी आज त्यांची भेट घेतलेल्या सत्ताधारी नऊ नगरसेवकांना दिलं.

हेही वाचाः तुमच्या मोबाईल सिम कार्डशी संबंधित नियम बदलले! सरकारने दिली आता ही माहिती

नगराध्यक्ष डॉ. लक्ष्मण नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष अँथनी वाझ, नगरसेवक गौरी देसाई, उद्देश देसाई, लॅंड्री मास्कारेन्हस, जमीरा पेरैरा, रेखा फर्नांडीस, रायमुंडो डिसोजा आणि जॉन डायस यांनी आज विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांची भेट घेऊन कुंकळळी नगरपालीकेतील विवीध समस्यांवर चर्चा केली. तसंच त्यांच्या मदतीची विनंती केली. यावेळी माजी मंत्री ज्योकीम आलेमाव आणि युवा काँग्रेस नेते युरी आलेमाव उपस्थित होते.

भाजप सरकारचे दिवस भरले

गोव्यातील भाजप सरकारचे दिवस भरलेत. २०२२ मध्ये काँग्रेसचं सरकार गोव्यात स्थापन होणार आहे, असं कामत यांनी सर्व नगरसेवकांना सांगितलं. सन २००७ ते २०१२ या काँग्रेसच्या राजवटीतच कुंकळ्ळीचा विकास झाला याची आठवण दिगंबर कामत यांनी करुन दिली.

हेही वाचाः आठ महिन्याच्या चिमुरडीला HIV ची लागण; संक्रमित रक्त दिल्याची घटना

कामतांचे आभार

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी वेळ देऊन आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यावर योग्य तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असं नगराध्यक्ष डॉ. लक्ष्मण नाईक म्हणाले.

हेही वाचाः अबब! 2000 रुपयांचा वडापाव; सोन्याचा वर्ख, चीज स्टफिंग, सारा थाटच न्यारा

कुंकळ्ळीचा विकास करण्याचं ध्येय बाळगलेल्या सर्व नगरसेवकांचा मी ऋणी

गोव्यात केवळ कुंकळ्ळी नगरपालिकेत काँग्रेस पक्षाने पुरस्कृत केलेलं पूर्ण बहुमतातील नगरपालिका मंडळ असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. कुंकळ्ळीवासियांना विकास आणि चांगली सेवा देण्यास सर्व नगरसेवक वचनबद्ध आहेत. संघटीतपणे काम करुन कुंकळ्ळीचा विकास करण्याचं ध्येय बाळगलेल्या सर्व नगरसेवकांचा मी ऋणी आहे, असं युरी आलेमाव म्हणाले.

हेही वाचाः वर्ल्ड फोटोग्राफिक कप – २०२२ः गोंयकार फोटोग्राफर टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणार

सगळा मनमानी कारभार

कुंकळ्ळी नगरपालिकेतील मुख्याधिकारी आणि पालिका अभियंता यांचा मनमानी कारभार आणि त्यामुळे विकास कामांवर होणारा परिणाम यावर सर्व नऊ नगरसेवकांनी विरोधी पक्ष नेत्यांचं लक्ष वेधलं आणि सदर अधिकारी स्थानिक आमदार तसंच सत्ताधारी भाजप सरकारच्या दबावाला बळी पडत असल्याचं कामत यांच्या निदर्शनास आणून दिलं.

हा व्हिडिओ पहाः Breaking | Politics | Congress | काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक शुक्रवारपासून पुन्हा गोव्यात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!