भाजप सरकार राजकीय दरोडेखोर

किरण कांदोळकरांची घणाघाती टीका

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः भाजप सरकार हे राजकीय दरोडेखोर असून काँग्रेसच्या आमदारानंतर आता म्हापशातील नगरसेवकांना फोडून भाजपने राजकारणात निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे, अशी घणाघाती टीका गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी केली आहे. मंगळवारी ‘म्हापशेकारांचो एकवट’ गटातील नगरसेवक तारक आरोलकर, विकास आरोलकर आणि विराज फडके यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर दुपारी कांदोळकर यांनी काणका बांध येथे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपच्या या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.

भाजप सरकार फोडाफोडीत मग्न

एकाबाजूने करोना महामारीत आरोग्य सेवेसाठी, तर दुसरीकडे हल्लीच आलेल्या चक्रीवादळातून जनता सावरत आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत झालेला नसताना भाजप सरकार फोडाफोडीच्या राजकारणात मग्न आहे, असा आरोप कांदोळकर यांनी केला.

हेही वाचाः ‘या’ देशानं लॉकडाऊनशिवाय मिळवलं कोरोनावर नियंत्रण !

पुन्हा एकदा आपला खरा चेहरा जनतेसमोर ठेवला

हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो हटाव मोहिमेंर्गत या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येणारे म्हापसा पालिकेच्या प्रभाग सात आणि प्रभाग आठमधील मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं होतं. पण जनमत डावलून भाजपाने पुन्हा एकदा आपला खरा चेहरा जनतेसमोर ठेवला आहे. प्रभाग सात आणइ प्रभाग आठ मधून अनुक्रमे तारक आरोलकर आणि विकास आरोलकर हे बंधू निवडून आले होते. त्यांच्या मताधिक्क्याद्वारेच लोकांनी हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो हटाव मोहिमेचा श्रीगणेशा घातला होता, असा दावा कांदोळकरांनी केला.

हेही वाचाः पोलिस कॉन्स्टेबल, बिल्डर ते राजकारणी

भाजपने हळदोणातील मतदारांचा रोष अजून ओढवून घेतला

नगरसेवक आरोलकर बंधूंच्या प्रचारार्थ आपण उतरलो होतो. ते भाजपात सामिल झाले, हे मला मीडियाच्या माध्यमातूनच समजलं. प्रभाग सात आणि आठच्या मतदारांनी भाजप आणि ग्लेन टिकलो यांच्या विरोधात मतदान केलं होतं. हे जनमत भाजपने चोरलं आहे. हे नगरसेवक भाजपात गेले, याचा अर्थ आपण घाबरलो असं मुळीच होत नाही. तर भाजपने हळदोणातील मतदारांचा रोष अजून ओढवून घेतला आहे. आगामी विधानसा निवडणूकीवेळी तो दिसेलच, असं कांदोळकर म्हणाले.

हेही वाचाः 17 वर्षाखालील 16 हजाराहून अधिक मुलांना दोन्ही लाटेत कोरोनाची लागण

सत्ता भोगण्याकडे भाजपचा कल

यापूर्वी भाजपाने काँग्रेसचे दहा आमदार पळविले होते. तसंच विश्वजित राणे, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांचंही उदाहरण जनतेसमोर आहे. जनसेवेपेक्षा फक्त लोकप्रतिनिधींना पळवून सत्ता भोगण्याकडे भाजपचा कल आहे, अशी टीकाही कांदोळकर यांनी केली.

हेही वाचाः औषधांच्या कमतरतेची न्यायालयीन चौकशी करा

स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता स्थापनेकडे लक्ष

आपलं राज्य करोना मुक्त म्हणजे ग्रीन झोनमध्ये होतं. पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या सरकारने रेड झोन नव्हे, तर मृत्यूच्या झोनमध्ये गोव्याला पोहचवलं. फोडाफोडीच्या राजकारण वृत्तीमुळे सरकारचं या भयंकर स्थितीतही वैद्यकिय सुविधांपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता स्थापनेकडे लक्ष आहे. त्यामुळेच गोमेकॉमध्ये उपचार घेण्यास करोना रूग्ण घाबरत आहेत, असा आरोप कांदोळकर यांनी केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!