कोविड व्यवस्थापनात भाजप सरकार पूर्ण अपयशी

'आप'ची राज्य सरकारवर टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोविड व्यवस्थापनात भाजप सरकार पूर्ण अपयशी ठरलं आहे, अशी टीका आम आदमी पक्षाने (आप) केली. ऑगस्ट 2020 ते जून 2021 पर्यंत नोंद न झालेल्या कोविड मृत्यूंबाबत प्रतिक्रिया देताना ‘आप’ने राज्य सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री राजकीय डावपेचात व्यस्त

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे राजकीय डावपेचात व्यस्त आहेत. ही चौथी वेळ आहे जेव्हा नोंदणी न झालेले मृत्यू सापडले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ही एकूण संख्या 142 झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘आप’चे संयोजक राहुल म्हांबरे यांनी मागीन नोंद न झालेल्या मृत्यूंचं बुलेटिन जारी करण्याची मागणी केली होती.

सरकारने मृत्यूंचं बुलेटिन जारी करावं

गोवा सरकारने या मृत्यूंचं बुलेटिन जारी केलं पाहिजं. यामध्ये मृत्यूचं कारण, प्रवेशाची तारीख, रुग्णाच्या मृत्यूचं कारण, मृत्यू किती तासात झाला आणि रुग्णाचं लसीकरण केलं गेलं होतं का यासारखी महत्त्वाची माहिती असणं अपेक्षित आहे. अशा डेटाचं विश्लेषण डॉक्टर आणि साथीच्या रोगशास्त्रज्ञांना साथीच्या रोगांच्या भविष्यातील कृती ठरविण्यात मदत करतं. 68 न नोंदवलेल्या मृत्यूंची ताजी आकडेवारी ही केवळ मृतांच्या कुटुंबियांचा अपमानच नाही, तर जे जीव वाचवण्यासाठी या माहितीवर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी हा अपमान आहे, असा आरोप म्हांबरेंनी केला.

या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी

ही चिंतेची बाब असून या प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशीची मागणी करत आहोत आणि तोपर्यंत राणे यांनी नैतिक आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी म्हांबरेंनी केली.

हा व्हिडिओ पहाः POLITICS | MGP | सुदिन ढवळीकरांची मुख्यमंत्र्यांवर चौफेर टीका

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!