गोव्यातील खाण व्यवसायावरील अवलंबितांचं संरक्षण करण्यात भाजप अपयशी

आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरेंची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने राज्यातील सर्व १३९ खाणपट्ट्यांच्या पर्यावरण मंजुरीवर निलंबनाची घोषणा केल्यानंतर २०१२ पासून राज्यातील खाणकामांचं काम रखडलं आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत खाण क्षेत्रातील सुमारे ४०% वाटा आहे आणि ज्यावर जवळजवळ ३ लाख कुटुंबे पूर्णपणे अवलंबून आहेत, सध्या चालू असलेल्या महामारीत आणि गोवा राज्यात खाण व्यवसाय बंद झाल्यामुळे आणखीन कठीण परिस्थितीत ते स्वत:ला पहात आहेत, अशी टीका आम आदमी पक्षाचे (आप) गोवा संयोजक राहुल म्हांबरेंनी केलीये.

हेही वाचाः भाजपकडून शिक्षक विभागाची स्थापना

सरकारने खाण अवलंबितांना मदत करण्याची चिंता केली नाही

गोव्यातील भाजपा सरकारच्या अत्यंत कठोर स्वभावामुळे केवळ राज्याच्या अर्थव्यवस्थेचं पतन झालं नाही, तर खाणीवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या या सर्व कुटुंबांच्या संकटात भर टाकली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाणींचं काम पुन्हा सुरू करण्याविषयी किंवा या कुटुंबांना मदत करण्याची कधीही चिंता केली नाही, असा आरोप म्हांबरेंनी केलाय.

हेही वाचाः स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण आवश्यक

पुन्हा खाण सुरू केल्याने राज्याच्या महसुलात आणखी भर पडली असती

खाण आणि भूशास्त्र संचालनालयाचे संचालक विवेक एचपी यांनी असंही म्हटलं होतं की, राज्याचं उत्पन्न मिळविण्यास मदत करण्यासाठी जेटी येथे २६ दशलक्ष टन लोह खनिजाचा ई-लिलाव होईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करण्याऐवजी खाणींचा पोर्टफोलिओ देखील होता. परंतु नंतर सुप्रीम कोर्टाने तो फेटाळून लावला, यामुळे गोव्यातील खाण क्षेत्र पुन्हा सुरू होण्यास विलंब झाला आहे. राज्य आणि आपला देश साथीच्या आजाराशी झुंज देत असताना, कठीण परिस्थितीत पुन्हा खाण सुरू केल्याने राज्याच्या महसुलात आणखी भर पडली असती, असंही म्हांबरेंनी म्हटलंय.

हेही वाचाः CRIME UPDATE | अमर नाईक हत्याकांडामागील मुख्य सूत्रधारासाही लवकरच अटक होणार

खाण घोटाळ्यातील एक पैसादेखील वसूल करण्यात भाजप सरकार अपयशी

गोव्यात खाणकाम चालू असलं पाहिजे, जे दीर्घकाळ टिकणारं असेल आणि गोव्यातील लोकांच्या हितासाठी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या हितासाठी हे योग्य राहिल, असं म्हांबरे म्हणाले. पुढे त्यांनी गोव्यातील लोकांना ३५,००० कोटींच्या खाण घोटाळ्याची आठवण करून दिली, ज्यामध्ये काँग्रेसचे सरकार सहभागी होतं. परंतु आजपर्यंत या खाण घोटाळ्यातील एक पैसादेखील वसूल करण्यात भाजप सरकार अपयशी ठरलं आहे आणि या खटल्याचा पाठपुरावा करण्यात किंवा दोषीला अटक करण्यातदेखील अपयशी ठरलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!