भाजपचे गोवा प्रभारी म्हणतात, ‘जेएनयूचं नाव बदलून स्वामी विवेकानंद यां नाव द्या!’

नावात काय ठेवलंय? असं कुणी म्हटलं होतं माहीत आहे का?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी : दिल्लीच्या जेएनयूचे नाव बदलून स्वामी विवेकानंद विद्यापीठ करावं, अशी मागणी भाजपच्या गोवा प्रभारींनी केली आहे. या मागणीमुळे ते चर्चेत आलेत.

भाजपच्या गोव्या प्रभारीपदी कर्नाटकच्या माजी मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांचं नाव आहे सी टी रवी. 13 नोव्हेंबरला ही नेमणूक करण्यात आली होती.

काँग्रेस पाठोपाठ आता भाजपचेही गोव्याचे प्रभारी कर्नाटकातील असणार आहेत. फक्त गोवाच नाही तर महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे भाजपचे प्रभारी म्हणून ते काम करणार आहेत. त्यांनी केलेल्या या मागणीमुळे नवी चर्चा रंगू लागली आहे. 16 नोव्हेंबरला ट्वीट करत त्यांनी ही मागणी केली आहे.

काँग्रेसची प्रतिक्रिया

सी टी रवी यांनी केलेल्या मागणीवर काँग्रेसनंही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अजन माकन यांनी नाव बदलण्याच्या मागणीवर सडेतोड उत्तर दिलं आहे. नाव बदलून कुणी माणूस लहान किंवा मोठा होणार नाही. नामांतराच्या राजकारणावर काँग्रेसचा विश्वास नसल्याचं अजय माकन यांनी म्हटलंय.

जेएनयूत विवेकानंदांच्या मूर्तीचं अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लीच स्वामी विवेकानंदांच्या मूर्तीचं अनावरण केलं होतं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी हे अनावरण केलं होतं. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि तरुणांशी संवाद साधत विवेकानंदांच्या विचारांवर जगण्याचा संदेश दिला होता.

गेल्या वर्षी 14 नोव्हेंबरला याच मूर्तीवरुन वाद झाला होता. तर हल्लीच जेएनयूमध्ये 13.3 फूट उंच असणाऱ्या विवेकानंदांच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!