भाजपच्या चुकीला माफी नाही!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : गोव्यातील भ्रष्ट, असंवेदनशील व डिफेक्टीव्ह भाजप सरकारच्या प्रत्येक चुकीच्या ॲक्शनला युवा कॉंग्रेस स्टाईलने रीॲक्शन देण्यात येईल, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकारला इशारा दिला.
गोवा प्रदेश कॉंग्रेस तर्फे लोकांचे प्रश्न हातात घेऊन त्यावर आवाज उठवीण्याच्या कार्याचे चोडणकर यांनी कौतुक केले. गोवा युवक कॉंग्रेस तर्फे पणजी येथे आयोजित ‘युवा जागोर’ सम्मेलनात ते बोलत होते. गिरीश चोडणकर यांनी युवक कॉंग्रेसच्या सदस्यांना “वन बुथ फाईव्ह युथ” मोहीम हाती घेण्याची विनंती केली.
अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे प्रभारी कृष्णा अलावरु यांनी गोवा युवक कॉंग्रेस सदस्यांना युवकांसाठी रोजगार संधी उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले. गोवा युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांच्या नेतृत्वाची त्यांनी प्रशंसा केली.
अकार्यक्षम भाजपचा पराभव अटळ!
युवकांचा प्रचंड सहभाग असलेल्या युवा जागोरने आज प्रत्येक युवकाच्या मनात एक नवचेतना जागृत झाल्याचे सांगुन, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी यापुढे युवकांच्या सहभागाने गोव्यातील अकार्यक्षम भाजप सरकारचा पराभव अटळ असल्याचे प्रतिपादन केले. युवक कॉंग्रेस आज प्रखरपणे सरकारच्या चुकीच्या धोरणांचा व योजनांचा विरोध करीत असुन, त्यामुळे लोकांच्या मनामध्यो जागृती झाली आहे व सन २०२२ मध्ये कॉंग्रेस सरकार स्थापन होणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी युवक कॉंग्रेसचे मु्क्त कंठाने अभिनंदन केले व कॉंग्रेस पक्ष युवकांची नेहमीच दखल घेत असल्याचे सांगीतले.
पक्षकार्याला झोकून द्या!
गोवा युवक कॉंग्रेस आता पुर्ण जोमाने कार्य करणार असुन, भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराला कणखरपणे वाचा फोडणार आहे. युवक कॉंग्रेस सदस्यानी यापुढे अधिक दक्ष राहुन कार्य करावे व सन २०२२ मध्ये गोव्यात कॉंग्रेस सरकार स्थापन करण्यासाठी आतापासुनच अहोरात्र झटावे, असे युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी सांगीतले.
अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे गोवा प्रभारी अखिलेश यादव यांनी यावेळी युवकांना संबोधित केले. गोवा प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, युवा कॉंग्रेस प्रभारी जनार्दन भांडारी, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी गोवा युवक कॉंग्रेसच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
सुत्रसंचालन अर्चित शांताराम नाईक व विवेक डिसील्वा यांनी केले. युवा जागोरला माजी आमदार आगनेलो फर्नांडिस, प्रताप गावस, म्हापसाचे माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, सांताक्रुझचे कॉंग्रेस नेते रुडोल्फ फर्नांडिस तसेच इतर पदाधिकारी हजर होते. सम्मेलनांत शेकडो युवकांनी उपस्थिती लावली.