दिल्लीतील चर्च पाडण्यास भाजप-आप जबाबदार, केजरीवाल खोटं बोलले

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांचा आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः दिल्लीतील चर्च पाडण्यात भाजप आणि ‘आप’ सरकार जबाबदार आहे. सदर धार्मिक स्थळ पाडण्यापूर्वी त्यांना साधी नोटीस देण्याचं सौजन्यही भाजप आणि आपने दाखवलं नाही. भाजप आणि ‘आप’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कलह माजवून समाजात फूट घालण्याचं काम हे दोन्ही पक्ष करत आहेत. नवी दिल्लीत पाडलेल्या चर्चबद्दल मला काहीच माहीत नसल्यासारखं दाखवणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खोटं बोलत आहेत, असा सणसणीत आरोप डॉ. शमा मोहम्मद यांनी केला आहे.

हेही वाचाः भाजप सरकार करतंय जनतेची लूट; महामारीच्या काळात देतंय अधिक यातना

दिल्लीत चर्च पाडण्यात भाजप-‘आप’ दोघेही जबाबदार

बुधवारी गोव्यात सदर चर्च जमीनदोस्त करण्याच्या कृतीवर भाष्य करताना आपच्या केजरीवालांनी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमीका घेण्याचा प्रयत्न केला. दिल्ली विकास प्राधिकरणात ‘आप’चे दोन आणि भाजपचा एक आमदार सदस्य असून, भाजपचे तीन नगरसेवक सदर प्राधिकरणावर आहेत. या चर्च पाडण्याच्या कृत्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोघेही जबाबदार आहेत, असं डॉ. मोहम्मद म्हणाल्या.

हेही वाचाः वाढलेल्या डीएमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार, हे जाणून घ्या

मौन बाळगलं

दिल्लीचे ‘आप’चे आमदार दिलीप पांडे आणि सोमनाथ भारती यांनी सदर धार्मिक स्थळ पाडलं जात असताना केवळ बघ्याची भूमीका घेतली. भाजपचे आमदार ओ. पी. शर्मा यांनी ही मौन बाळगलं असं डॉ. मोहम्मद म्हणाल्या.

हेही वाचाः पावसात जलसमाधी घेतलेल्या कारच्या बदल्यात मालकाला मिळाली दारात नवी कोरी कार

भाजप-‘आप’चे संबंध पुन्हा उघड

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सदर चर्च पाडण्यास भाजप आणि ‘आप’ जबाबदार असल्याचं सांगितलं. या बेकायदेशीर आणि असंवेदनशील कृतीने भाजप-‘आप’चे संबंध परत एकदा उघड झाल्याचं सांगितलं.

हेही वाचाः नवनिर्वाचित राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लईचं गोव्यात आगमन

चर्च पाडण्याच्या कृतीचा निषेध

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी दिल्लीतीच चर्च पाडण्याचा कृतीचा निषेध केला. गोमंतकीय ‘आप’चा बेगडी दिखावूपणा ओळखण्यासाठी हुशार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!