BIRTHDAY WISHES | राणेंकडून सावंतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आमदार नितेश राणेंनी दिल्या शुभेच्छा, वाढदिवसानिमित्त फेसबुकवर टाकली शुभेच्छांची पोस्ट

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आमदार नितेश राणे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आपल्या नेतृत्वाखाली गोवा राज्यानं प्रगतीचं अत्युच्च शिखर गाठावं, अशा शुभेच्छा आमदार राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना दिल्या आहेत. यासंदर्भात राणे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे.

राणे-सावंत सध्या चर्चेत

गेल्या काही दिवसात राणे कुटूंबिय आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत चर्चेत आहेत. सिंधुदुर्गातील वाळू डंपरना गोव्यात प्रवेश मिळावा, यासाठी माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना फोनवरून विनंती केली होती. डॉ. सावंत यांनीही त्याला प्रतिसाद देत हा प्रश्न सोडवला होता. त्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी स्व:ता येऊन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आभार मानले होते. त्यानंतर डॉ. सावंत यांनी कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध केलेल्या कोरोना किटचा उल्लेख करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका करणारं ट्विटही नितेश राणेंनी केलं होतं.

नम्र विनंती, यंदा कसलेच सोहळे नकोत!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 24 एप्रिलला त्यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी कोणतेच सोहळे नकोत म्हणत फेसबुकवर ट्विट केलं होतं. राज्यातील जनतेला कोरोना संसर्गापासून बचाव करून स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!