हरवळेत २३ लोकांना वाचवण्यात यश, डिचोलीत मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : मुसळधार पावसाचा तडाखा डिचोली तालुक्याला बसलाय. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे डिचोलीतील जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक भागांना पुराच्या पाण्यानं वेढलं. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या २३ जणांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. या सर्व जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.

सकाळीच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी डिचोलीत दाखल होऊन पाहणी केली. यावेळी त्यंनी स्थानिकांशी संवाद साधत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, आता नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार याकडेही सगळ्यांची नजर लागली आहे.

हेही वाचा : पहाटे ३ वाजता पुराचं पाणी घरात शिरलं, जीव वाचवायचा की घर वाचवायचं? अखेर घर कोसळलंच!

गुरुवारी राज्याला रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार गुरुवार सकाळपासूनच मुसळधार पावसानं राज्यात सर्वदूर हजेरी लावली होती. मुसळधार पावसाचा फटका उत्तर गोव्यातील तालुक्यांना बसला असून मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झालंय. अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नसलं, तरीही अनेकांच्या शेतीचं, घरांचं, बागायतीचं पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालंय.

हेही वाचा : Rain Update | Video | पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग! पैकुळमध्ये पूल वाहून गेला

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!