Lockdownबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं मोठं विधान! म्हणाले…

डॉक्टर प्रमोद सावंत यांची केंद्राकडे मागणी

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : एकीकडे राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णंसंख्या वाढतेय. महाराष्ट्रात लॉकडाऊनसदृश्य कडक निर्बंध आजपासून लागू करण्यात येणार आहेत. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातही लॉकडाऊन होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.

हेही वाचा – देशात गेल्या 24 तासांत 1 हजारपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू, रुग्णवाढही दोन लाखाच्या जवळ

लसीकरणासाठी वयाची अट नको!

45पेक्षा कमी वय असलेल्यांचं लसीकरण करायला केंद्रानं मान्यता द्यावी, अशी मागणी केंद्राकडे केल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलंय. लसीकरणाची वयोमर्यादा ४५ पेक्षा कमी करुन हॉस्पिटिलीटी क्षेत्रातील लोकांच्या लसीकरणाला मान्यता द्यावी, असं मुख्ममंत्र्यांनी म्हटलंय. फायर ब्रिगेडच्या मुख्यालयातील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा पर्याय नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसंच लॉकडाऊन केलं तर पर्यटनासारख्या गोवा राज्यातील जनतेला मोठा फटका सहन करावा लागेल. त्यामुळे लॉकडाऊनपेक्षा लोकांनी काळजी घेणं, मास्क, सॅनिटायझर वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग मेन्टेन करणं याचीच नितांत आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

हेही वाचा – कृषी अधिकार्‍याचा कोरोनाने मृत्यू

corona-1-1

लॉकडाऊन नकोच!

महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यातीलकोविड स्थितीबाबत माहिती दिली असल्याचंही प्रमोद सावंत यांनी म्हटलंय. सरकारचा पुन्हा लॉकडाउन करण्याचा सध्यातरी कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र लोकांनी मार्गदर्शक तत्व पाळली तर आम्ही कोविड नियंत्रणात आणू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय.

पाहा मुख्यमंत्र्या काय म्हणालेत? व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

रुग्णवाढीची चिंता कायम

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा पुन्हा एकदा 550च्या पार गेलाय. मंगळवारी दिवसभरात तब्बल 562 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या आता 4 हजार 800च्या पार गेली आहे. मंगळवारी राज्यात 562 नवे रुग्ण आढळून आलेत, तर तिघांचा मृत्यू झालाय. राज्यातील सध्याच्या घडीला एकूण 4 हजार 888 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेट आणखी घसरला असून आता तो 90.94 टक्क्यांवर आला आहे. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानंही वाढली आहे. विशेष म्हणजे गेल्या 7 दिवसांत तब्बल 3502 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही वाढ चिंताजनक मानली जाते आहे. तर 7 दिवसांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!