मोठी बातमी | अभ्यासाला लागा! अंतिम परीक्षेचं वेळापत्रक आलं

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : परीक्षांबाबात एक महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. दहावी बारावीच्या परीक्षांसोबतच विद्यापीठाच्या फायनल इयरच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय जारी करण्यात आला आहे. गोवा विद्यापीठानं परीपत्रक काढत परीक्षांबाबतचा निर्णय जारी केलाय.

कुणाच्या कधी परीक्षा?

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. दहावीची परीक्षा 13 मे पासून सुरु होणार आहे तर बारावीची परीक्षा 26 एप्रिलपासून सुरु होणार आहे. या दोन्ही परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक 15 जानेवारीपर्यंत जारी करण्यात येणार आहे.

हेही वाचा – पोस्टमन ते यशस्वी शेतकरी, एका अवलियाची यशोगाथा

असं आहे दहावी बारावीचं वेळापत्रक :

12वीची परीक्षा – प्रॅक्टीकल 1 ते 24 एप्रिल
लेखी परीक्षा – 26 एप्रिल ते 15 मे 2021

10 वीची परीक्षा – प्रॅक्टीकल 5 ते 30 एप्रिल
लेखी परीक्षा – 13 ते 31 मे 2021

फायनल इयरचंही ठरलं!

फायनल इयरच्या परीक्षांचा वाद सुरु होता. अशातच गोवा विद्यापीठानं या वादावर तोडगा काढण्यासाठी अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 28 डिसेंबरपासून फायनल इयरच्या परीक्षा होणार होत्या. मात्र आता या परीक्षा 28 डिसेंबरऐवजी 11 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. गोवा विद्यापीठानं जारी केलेल्या परीपत्रकातून याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गोवा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होणाऱ्या परीक्षा 11 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान ऑफलाईन पद्धतीनंच घेतल्या जाणार आहेत. सोबतच ऑनलाईन परीक्षा आधी जारी केलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत.

ऑफलाईन परीक्षेला विरोध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा घेण्याला विरोध दर्शवला होता. दरम्यान आता विद्यार्थी नेमकी काय भूमिका घेतात, हेही पाहणं महत्त्वाचंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!