मोठी बातमी! गोवा भूमी अधिकारीता विधेयक मंजूर

आगामी निवडणुकीत गेम चेंजर ठरणारं विधेयक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : जमीन मालकी हा गोव्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. अनेक वाद जमिनींवरुन राज्यात आहेत. या सगळ्याच्या धर्तीवर या पावसाळी अधिवेशनात ज्या विधेयकाची जोरात चर्चा होती, ते भूमी अधिकारीत विधेयक अखेर मंजूर करण्यात आलं आहे.

गेम चेंजर!

गोवा विधानसभेत गोवा भूमी अधिकारीता विधेयक संमत करण्यात आल्यानं हे विधेयक आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपासाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यात आहे. कारण सर्वसामान्य लोकांना घरांची मालकी मिळणार आहे. भाजप सरकारनं या पावसाळी अधिवेशनात ऐतिहासिक कायदा मंजूर केल्याला मोठं महत्त्व आहे. डॉ.प्रमोद सावंत यांचा क्रांतिकारी निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय. 250 चौ.मीटर जागेची मालकी देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

कुळ-मुंडकार तसेच इतर अनेक जमिनींचे विषयही आता निकाली निघणार आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वीची घरे नियमित होणार असून सरकारी जमिनीतील घरेही दंड भरून नियमित केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे कोमुनिदाद, आल्वारा, खाजगी जमिनीतील घरांचा विषय यानिमित्ताने निकाली निघाणार आहे.

मोठा दिलासा

जमीन आणि घरांची मालकी नसल्याने ग्रामीण भागांतील लोकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. गावांगावात लोकांचे तंटे वाढत आहेत. कुणीही घरांची दुरूस्ती किंवा नवीन घरे बांधण्याचा प्रयत्न केला तर त्यासंबंधी जमिनीची मालकी नसल्यामुळे तक्रारी आणि कोर्टकचेरी अशा समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत होते. 250 चौ.मीटरपर्यंतच्या घरांना कायदेशीर मान्यता देऊन त्यांना मालकी दिली तर तो मोठा दिलासा गोंयकारांना मिळणार आहे.

हेही वाचा : Live Updates | पावसाळी अधिवेशन | दिवस तिसरा | विधानसभेचा आखाडा, ताज्या घडामोडी

गोवा राज्य आपल्या मुक्तीची साठ वर्षे साजरी करत असताना जमीन आणि घरांची मालकी मिळवून देणारं हे बील ऐतिहासिकच म्हणावं लागणार आहे. आता यापूर्वी अनेक कायदे आणले. परंतु लोकांना न्याय काही मिळू शकला नाही. आता आगामी विधानसभा निवडणूकांना फक्त सहा- सात महिन्यांचा अवधी शिल्लक असताना हे विधेयक मंजूर झाल्याने याचा खरोखरच लोकांना फायदा होईल की हे फक्त निवडणुकीसाठीचा जुमला आहे, हे येणार काळच सांगू शकेल!

हेही वाचा : पंचनामा | खरंच अल्वारा जमीन सरकारच्या मालकीची?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!