मोठी बातमी! ऑक्टोबर महिन्यात गोवा विधानसभेचं दोन दिवसीय अधिवेश

18 आणि 19 ऑक्टोबर रोजी अधिवेशनाचं आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतेय. गोवा विधानसभेचं दोन दिवसीय अधिवेश होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात दोन दिवस अधिवेशन घेतलं जाणार आहे.

18 आणि 19 ऑक्टोबर रोजी गोवा विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन

18 आणि 19 ऑक्टोबर रोजी गोवा विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या पूर्वी होणाऱ्या या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याची नजर असणार आहे. 18 ऑक्टोबरला या अधिवेशनाची सुरुवात होईल. तर 19 ऑक्टोबरला शेवट होईल. या दोन दिवसांच्या अधिवेशाच्या काळात नेमकं काय काय कामकाज होतं, ते पाहणं महत्त्वाचंय. पण राज्यातील चाळीसही आमदारांच्या दृष्टीनं हे अधिवेशन महत्त्वाचं ठरणार आहे. आपआपल्या मतदारसंघातील लोकांबाबत आपण किती जागृक आहोत, हे सांगण्याची धडपड या दोन दिवसीय अधिवेशनात पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, मागच्या वेळेप्रमाणेच यावेळचं अधिवेशनही रात्री उशिरापर्यंतच चालू राहण्याची शक्यता आहे.

गोवा विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपुष्टात

गोवा विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपुष्टात येतो. त्याआधीच हे अधिवेशन कदाचित शेवटचं अधिवेशनही ठरण्याची शक्यताय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!