मोठा निर्णय : साटेली भेडशी बाजारपेठ राहणार तब्बल ११ दिवस बंद

५ जूनपासून मेडिकल वगळता सर्व दुकानं राहणार बंद : सरपंच लखू खरवत

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोडामार्ग : कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालल्याने दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी ही मोठी बाजारपेठ तब्बल ११ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या ग्रामस्तरीय सनियंत्रण समितीने घेतला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा सरपंच लखु खरवत यांनी दिली आहे.

सध्या शेती व बेगमीचा हंगाम तोंडावर आला असला तरी साटेली भेडशी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वाढत्या कोरोना रुग्णांची दखल ग्रामपंचायत सनियंत्रण समितीने घेतली आहे. दोडामार्ग तालुक्यातील शहर बाजारपेठ नंतर निम्म्याहून अधिक गावांची बाजारपेठ कोरोनाचा हॉटस्पॉट बनण्याची भीती आहे. साटेली भेडशी बाजारपेठेतील आता ५ जून पासून पुढील ११ दिवसांकरिता मेडिकल वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत, याबाबत सरपंच लखु खरवत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या काही दिवसात तब्बल १२९ रुग्ण साटेली भेडशी बाजारपेठ परिसरात पॉझिटिव्ह मिळाले होते. यातील ५५ रुग्ण एक्टिव्ह असून अजूनही ०५ जणांचा मृत्यू झालेला आहे. शिवाय साटेली भेडशी बरोबरच याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावागावांत कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. त्यामुळे शासनाबरोबर कोरोना ग्रामस्तरीय नियंत्रण कमिटीने हा निर्णय घेतल्याचे खरवत यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे. ५ ते १५ जून या कालावधीत मेडिकल वगळता सर्व सेवा बंद राहणार असून अवैधरीत्या कोणताही व्यावसायिक व्यवसाय करताना आढळल्यास त्याच्यावर सक्त कारवाई करणार असल्याचे खरवत यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!