ब्रेकिंग | ऑक्सिजनच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या रोज नवनवे उच्चांक गाठते आहे. त्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात ऑक्सीजनचा तुटवडा भासू नये यासाठी निर्यातीवर बंदी लागू करण्यात आली आहे. तसे आदेशही तात्काळ जारी करण्यात आले आहे. तर दुसरीकडे औद्योगिक ऑक्सिजन आरोग्य सेवेसाठी वळविण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आपत्कालीन व्यवस्थापनाअंतर्गत आदेश जारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचं आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा – STUDENT STRIKE | परीक्षा रद्द करा, अन्यथा ऑनलाईन परीक्षा घ्या!

कोरोना काळात अनेकदा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ऑक्सिजन बेडची सोय असणं हे फार गरजेचं असतं. अशावेळी शेजारील महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन आरोग्य यंत्रणेची जी धडपड सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारनं खबरदारीची पावलं उचलायला आधीच सुरुवात केली आहे.

हेही वाचा – पेडण्याची सून आणि मुंबईच्या महापौर म्हणत आहेत, मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन करण्याची गरज

विक्रमी रुग्णवाढीनंतर सतर्कता

शुक्रवारी विक्रमी रुग्णवाढ नोंदवण्यात आल्यानंतर राज्याची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे आता रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासोबतच रुग्णाचा जीव वाचवण्याला प्रथम प्राधान्य देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर घेतले जात आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व गोमंतकीयांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाची विधानंही केली होती. राज्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली होती. तर लसींच्या तुटवड्याबाबतही स्पष्टीकरण दिलं होतं.

हेही वाचा – वाह रे मुन्नाभाई! कम्पांऊडर चालवत होता २२ बेडचं हॉस्पिटल!

पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री?

हेही वाचा – Breaking | भारतात कोरोनाची त्सुनामी! तब्बल २ लाख ३४ हजार ६९२ नवे रुग्ण

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!