BIG BREAKING! उत्खनन झालेल्या खनिजाची वाहतूक करण्यास परवानगी

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
ब्युरो : राज्याच्या दृष्टीने एक मोठी बातमी समोर येते आहे. उत्खनन केलेल्या खनिजाची वाहतूक करण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. 31 जानेवारी, 2021 पर्यंत उत्खनन केलेल्या खनिजाची वाहतूक आता करता येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील खाण क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना मोठा दिलासा मिळालाय. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या परवानगीमुळे खनिज वाहतुकीनं राज्यात महसूल येण्यास मदत होणार आहे.
गेली काही वर्ष राज्यातील खजिन वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. त्याचा फटका राज्यातील अनेक कामगारांसह व्यावसायिकांनाही बसला होता. आता देण्यात आलेल्या परवानगीमुळे राज्यातील रोजगाराला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. पुढचे चार महिने खनिज वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
2018मध्ये राज्यातील खनिज वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने ही बंदी घातली होती. कथितरीत्या मायनिंग लिजधारकांनी घोटाळा केल्याचा आरोप एमबी शहा आयोगानं 2012मध्ये ठेवला होता. याबाबत एक अहवालही देण्यात आला होता. संसदेला हा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर यावर सुप्रीम कोेर्टात वारंवार खाण कंपन्यांनी धाव घेत आवाज उठवला होता. अखेर आता खनिज वाहतुकीला सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली आहे. मर्यादित काळासाठी देण्यात आलेल्या या परवानगीमुळे खाण कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
SC allows Goa mining firms to transport mined iron ore till Jan 31, 2021 pic.twitter.com/Q1KqzZwEmB
— ET NOW (@ETNOWlive) October 13, 2020
हेही वाचा –
मालपेची उतरण बनली अपघाताचा सापळा
73 हजार कोटी घ्या आणि खर्च करा… केंद्राची नवी योजना!
मातृभाषेतूनच व्हावं प्राथमिक शिक्षण! वाचा, कोण म्हणाले असं…