धाडसी निर्णय | सोमवारपासून सर्व खासगी रुग्णालयांतील बेड्सचा ताबा सरकार घेणार

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी शनिवारी एक मोठी घोषणा केली आहे. कोविडवर उपचार देणाऱ्या २१ खासगी रुग्णालयांतील सर्व बेड्सचा ताबा सरकार आपल्याकडे घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही धाडसी घोषणा केली आहे. सातत्यानं रुग्णांना उपचारासाठी टाळाटाळा होत असल्याच्या तक्रारी वारंवार ऐकू येत असल्यानं अखेर मुख्यमंत्र्यांनी हा धाडसी निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.

काय आहे निर्णय?

कोविडवर उपचार देणाऱ्या २१ खासगी रुग्णालयांतील ५० टक्के बेड्स सरकारनं कोविडसाठी राखीव ठेवण्याचे आदेश जारी केले होते. मात्र सातत्यानं आवाहन करुनही अनेक तक्रारी खासगी रुग्णालयांबाबत ऐकू येत होत्या. अखेर या तक्रारींवर रामबाण उपाय म्हणून आता सरकार खासगी रुग्णालयांतील सर्व बेड्स आपल्या ताब्यात घेणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. येत्या सोमवारपासून हा निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून रविवारी हा आदेश जारी केला जाणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे, सरकारी अधिकारी प्रत्येक खासगी रुग्णालयांत नेमण्यात येणार आहे. हे सरकारी अधिकारी रुग्णांच्या ऍडमिशनची म्हणजेच त्यांना दाखल करुन घेण्याची जबाबदारी पार पाडतील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. दरम्यान, कामाचं नियोजन आणि मॅनेजमेन्ट ही त्या-त्या रुग्णालयांचीच जबाबदारी असेल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे.

हेही वाचा – Positivity Rateमध्ये गोवा दुसऱ्या स्थानी! पण फरक फारसा नाही

बिलाचं काय?

दरम्यान, डीडीएसएसव्हाय चे लाभार्थी असणाऱ्यांचं शंभर टक्के बिल हे सरकार खासगी रुग्णालयांचा देईल, असंही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत रुग्णांना बेड्स मिळाला नाही, अशी तक्रार ऐकून घेतली जाणार नसल्याचे थेट संकेतच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. वाढत्या कोरोना संसर्गामुळे सरकारी आरोग्य यंत्रणेवर ताण आलेला आहे. मोठ्या संख्येन रुग्ण आता उपचारासाठी रुग्णालयात धाव घेत आहेत. मात्र अनेक खासगी रुग्णालयांमध्ये डीडीएसएसव्हायमुळे उपचार नाकारले जात आहेत, किंवा बेड्स दिले जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय. त्यामुळे अखेर खासगी रुग्णालयांती १०० टक्के बेड्स सरकार ताब्यात घेत असल्याचा धाडसी निर्णय घ्यावा लागत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा – २२ कोटी ५० लाखाच्या आयव्हरमेक्टिन घोटाळ्यावर मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री गप्प का?

आरोग्यमंत्र्यांचं थॅक्यू

दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या या निर्णयाचं कौतुक केलंय. खासगी रुग्णालयात रुग्णांची लूट सुरु असून अनेकदा जास्तीचं बिल आकारलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. तसंच बिल फेडलं नाही, तर मृतदेहाचा ताबाही काही रुग्णालयं देत नसल्याचे प्रकार समोर आल्याचं आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी म्हटलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयचां आरोग्यमंत्र्यांनी स्वागत करत त्यांचे आभार मानलेत. या निर्णयाचा गोव्यातील जनतेला फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – सलग तिसऱ्या दिवशी रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचं समोर!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!