भेंब्रे यांनी गैरप्रकारांवर आवाज उठवावा…

उद्योजक अवधूत तिंबलो : स्व. चंद्रकांत केणी पत्रकारिता पुरस्कार प्रदान

Goan Varta Live | प्रतिनिधी

नावेली : पत्रकारिता क्षेत्रात  उदय भेंब्रे  यांनी मोठी कामगिरी केली आहे. आज  समाजात जे होऊ नये ते घडत आहे. त्यावर  भेंब्रे यांनी आवाज उठवावा आणि  लोकांना मार्गदर्शन करावे, असे उद्गार प्रसिद्ध उद्योजक अवधूत तिंबलो  यांनी काढले.
हेही वाचाःचार तरुणींचा सेल्फीने घेतला बळी…

पुरस्कार उद्योजक अवधूत तिंबलो यांच्या हस्ते प्रदान

मडगाव नगरपालिका सभागृहात स्व. चंद्रकांत  केणी जयंतीनिमित्त आयोजित पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर  अॅड. उदय भेंब्रे, पत्रकार सुरेश वाळवे, पत्रकार राजू नायक,  दिनेश मणेरकर उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अॅड. उदय भेंब्रे यांना यंदाचा स्व. चंद्रकांत केणी पत्रकारिता पुरस्कार उद्योजक अवधूत तिंबलो  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साहित्यिक आणि पत्रकार स्व. चंद्रकांत केणी यांनी कोकणी भाषा आणि गोवा राज्य यांच्या उत्कर्षासाठी कार्य केले. त्यांचे कार्य पुढे नेणाऱ्या पत्रकाराला दरवर्षी  हा पुरस्कार देण्यात येतो.           
हेही वाचाःChicalim Accident: अल्पवयीन कारचालकाची अपना घरात रवानगी…

समाजात चाललेल्या चुकीच्या गोष्टी योग्यरितीने मांडायचा प्रयत्न करावा

उद्योजक अवधूत तिंबलो पुुढे म्हणाले की, पत्रकारिता क्षेत्रातील तज्ज्ञांनी योग्य मार्गदर्शन केल्यास अनैतिक गोष्टींना आळा बसू शकेल. समाजात चाललेल्या चुकीच्या गोष्टी योग्यरितीने मांडायचा प्रयत्न करावा. अॅड. उदय भेंब्रे यांनी जनमत कौल आंदोलनाच्या वेळी झालेल्या कार्याचा आढावा घेतला. लोकशाहीत विचारस्वातंत्र्य आणि उच्चारस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. 
हेही वाचाः53rd IFFI 2022: दिव्यांगासाठी चित्रपटाचे विशेष सादरीकरण…

कार्यक्रमाला मडगाव शहरातील मान्यवर उपस्थित

प्रास्ताविकात सुरेश वाळवे यांनी अॅड. उदय भेंब्रे यांनी  गोव्यासाठी दिलेले योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे, असे उद् गार काढले. सूत्रसंचालन राजू नायक यांनी केले. कार्यक्रमाला मडगाव शहरातील मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचाःपेडणेतील पुनीत तळवणेकरला पुण्यात ‘भूषण पुरस्कार’ प्नदान…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!