साहित्यिक पुंडलिक नाईक यांना ‘भांगराळो गोंयकार’ पुरस्कार

युवा कलाकार आणि संघटक नंदन कुंकळ्येकर याला ‘नित्य युवा पुरस्कार’;‘भांगराळे गोंय अस्मिताय' संस्थेतर्फे पुरस्कार

दयानंद राणे | प्रतिनिधी

वास्को: साहित्यिक पुंडलिक नाईक यांना ‘भांगराळे गोंय अस्मिताय’ या संस्थेचा ‘भांगराळो गोंयकार’ हा पुरस्कार कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या संस्थेचा पहिलावहिला ‘नित्य युवा पुरस्कार’ हा  युवा कलाकार आणि संघटक नंदन कुंकळ्येकर यांना प्रदान करण्यात आला.

हेही वाचाः ‘चामुंडेश्वरी देवी कृपा कर’ भक्तीगीताचं लोकार्पण

जुने म्हार्दोळ –वेर्णा येथील म्हाळसा नारायणी संस्थानच्या सभागृहात कार्यक्रम

जुने म्हार्दोळ –वेर्णा येथील म्हाळसा नारायणी संस्थानच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला ज्येष्ठ नाटकाकर श्रीधर कामत बांबोळकर, स्मार्ट लिंक कंपनीचे मालक आणि म्हाळसा नारायणी संस्थानचे अध्यक्ष कमलाक्ष नाईक, भागंराळे गोंय संस्थेचे अध्यक्ष राजेश प्रभू, पदाधिकारी सुरज कोमरपंत, पंढरीनाथ परब उपस्थित होते.

नाईकांची ‘अच्छेव’ ही कांदबरी जरूर वाचा

मंत्री गावडे यांनी पुंडलिक नाईक यांच्या कार्याचं कौतुक केलं. सध्या खाणीचा जो प्रश्न ऐरणीवर आहे, त्यासंबंधी पुंडलिक नाईक यांनी चाळीस वर्षांपूर्वीच आपल्या साहित्यातून संदेश दिला होता. त्यांनी कोणता संदेश दिला होता हे जाणून घेण्यासाठी त्यांची ‘अच्छेव’ ही कांदबरी जरूर वाचा, असं आवाहन गावडेंनी केलं.

हेही वाचाः ACCIDENT | रविवारी कवळे येथे अपघात

पुरस्कार मिळविण्यासाठी काहीच केलं नाही

मनुष्य जन्माला येताना गुण आणि अवगुणही घेऊन येत असतो. आपल्यातील अवगुण नष्ट करणं हे आपलंच काम असतं. वयाच्या सतराव्या वर्षापासून आपण लिखाण कार्य करायला सुरुवात केली होती. पुरस्कार मिळविण्यासाठी काहीच केलं नाही. मात्र पुरस्कार मिळतच राहिले, असं पुंडलिक नाईक म्हणाले.

हेही वाचाः सासष्टीत चेन स्नॅचिंगसह मोबाईल हिसकावून पळ काढण्याच्या घटनांत वाढ

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजेश प्रभू यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. तर पूर्णानंद च्यारी यांनी भांगराळे गोंय संस्थेच्या कार्याची आणि वाटचालीची माहिती दिली. 

हा व्हिडिओ पहाः Video | BJP | भाजपच्या राष्ट्रीय महिला सरचिटणीस सुखप्रित कौर गोव्यात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!