सावधान! बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट

कुडचडेत अनेक व्यावसायिकांना गंडा

Goan Varta Live | प्रतिनिधी

कुडचडे : कोरोना महामारीनंतर बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट वाढलाय. सर्वाधिक बनावट नोटा या 500 आणि २०० रुपयांच्या असल्याची माहिती समोर आलीए. दरम्यान बनावट नोटा देऊन फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच समोर आलाय. नकली नोटा देऊन फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना एका जोडप्याने गंडा घातल्याचा प्रकार दक्षिण गोव्यातील कुडचडे भागात घडलीए. तोंडावर मास्क आणि हेल्मेट घालून आलेल्या जोडप्याने बाजारातील काही व्यावसायिकांना नकली नोटा देऊन गंडवलं.
हेही वाचाःगोवन वार्ता लाईव्ह वेबसाईटच्या द्वितीय वर्ष पूर्तीनिमित्त…

तोंडावर मास्क व हेल्मेट घालून गंडवले

कुडचडेत बाजारात नकली नोटांचा सुळसुळाट वाढल्याच पहायला मिळत आहे. कुडचडे बाजारात ५०० व २०० रुपयांच्या नकली नोटा देऊन फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तोंडावर मास्क व हेल्मेट घालून आलेल्या जोडप्याने या व्यवसायिकांना गंडवले.
हेही वाचाःInterview | भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारा डेव्हलपमेंट फॉर्म्यूला…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!